ETV Bharat / sports

कोहली रचणार इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू - Chennai Super Kings

विराटने आयपीएलमध्ये ४ शतके ठोकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली ९६ पैकी ४४ सामन्यात बंगळुरुच्या संघाला विजय मिळाले.

विराट कोहली
author img

By

Published : Mar 22, 2019, 11:20 PM IST

चेन्नई - आयपीएलच्या १२ व्या पर्वास उद्यापासून (शनिवार) सुरूवात होत आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या संघात पहिला सामना रंगेल. या सामन्यात विराट कोहली नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरेल.

विराट एकाच संघाकडून आयपीएलचे ११ सीजन खेळला आहे. आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली तेव्हा बंगळुरूच्या संघाने त्याला विकत घेतले. तेव्हापासून तो सलग ११ सीजन या संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू दुसऱ्या संघात खेळताना दिसून आले. उद्याच्या सामन्यात विराट खेळला तर विराट सलग १२ वर्ष एकाच संघाकडून खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर करणार आहे.

फ्रेचाईजीने २०१३ साली रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्यानंतर हा संघ २००९, २०११ आणि २०१६ साली अंतिम सामन्यात मझल मारली. पण अजूनही विराटच्या संघाला आयपीएलचा किताबाची प्रतिक्षा आहे.

विराटने आयपीएलमध्ये ४ शतके ठोकली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली ९६ पैकी ४४ सामन्यात बंगळुरुच्या संघाला विजय मिळाले. तर ४७ मध्ये पराभव, २ सामने टाय आणि ३ सामन्यांचा निकाल लागला नाही.

Intro:Body:

कोहली रचणार इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.