कोलकाता - दोन वेळा आयपीएलच्या किताबावर मोहोर लावणाऱ्या केकेआरच्या संघासाठी वाईट बातमी आहे. आयपीएलच्या १२ व्या मौसमाला सुरुवात होण्यापूर्वी त्याचे महत्त्वाचे २ खेळाडूं बाहेर पडले आहेत. युवा गोलंदाज कमलेश नागरकोटी पाठोपाठ शिवम मावी दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
शिवम मावी पाठदुखीने त्रस्त आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळू शकणार नाही. रणजी क्रिकेटमध्ये तो उत्तरप्रदेशच्या संघाचे नेतृत्त्व करतो. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी अजून सहा महिने लागू शकतात.
शिवम आणि कमलेश हे दोघेही २०१८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक संघातील सदस्य आहेत. या विश्वचषकात त्यांनी आपल्या भेदक गोलंदाजीने अनेकांची मने जिंकली होती. कमलेश मागील वर्षीच्या आयपीएललादेखील मुकला होता. दोन्ही खेळाडूंना कमी वयात झालेली दुखापत हा केकेआरसोबतच भारतीय क्रिकेट बोर्डासाठीही चिंतेचा विषय असेल.