लाहोर - पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने भारतीय कर्णधार विराट कोहलीचा बचाव करत कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता करण्याची काहीच गरज नसल्याचे म्हटले आहे. कोहली जोरदार पुनरागमन करेल, असा विश्वास इंझमामने व्यक्त केला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताला दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेत कोहलीने २, १९, ३, १४ अशा धावा केल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा - 'आळशी रवी शास्त्रीला लगेच हाकला', नेटकरी भडकले
इंझमामने आपल्या यू ट्यूब चॅनेलवर कोहलीबद्दल प्रतिक्रिया दिली. 'बरेच लोक कोहलीच्या शैलीवर आणि बर्याच गोष्टींबद्दल बोलत आहेत. मला या सर्व गोष्टींमुळे आश्चर्य वाटले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत, आपण त्याच्या शैलीवर कसे प्रश्न विचारू शकता? एक क्रिकेटर म्हणून मी म्हणू शकतो की खेळाडूंच्या कारकीर्दीत एक कालावधी असतो जेव्हा ते खूप प्रयत्न करूनही धावा करण्यास असमर्थ असतात. मोहम्मद युसूफची बॅकलिफ्ट जास्त होती. जेव्हा त्याचा फॉर्म खराब सुरू झाला तेव्हा लोक त्याच्या शैलीबद्दल बोलू लागले. त्यामुळे कोहलीने आपल्या शैलीत बदल करू नये', असे इंझमामने म्हटले आहे.
'कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. हे सर्व बदलेल. मला तंत्राबद्दल बोलण्याची देखील इच्छा नाही. विराटने आपले तंत्र बदलू नये. तो एक मजबूत मानसिकता असलेला खेळाडू आहे. त्याला काळजी करण्याची गरज नाही. तो दणक्यात पुनरागमन करेल', असेही इंझमामने म्हटले आहे.