ETV Bharat / sports

पाहुण्या संघाच्या अडचणीत भर, इंग्लंडचे २ महत्त्वाचे खेळाडू जायबंदी - सॅम बिलिंग्जला दुखापत

भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्जला दुखापत झाली आहे. मॉर्गनच्या हाताचा अंगठ्या दुखापत झाली. तर दुसरीकडे बिलिंग्ज क्षेत्ररक्षण करता दुखापतग्रस्त झाला. चेंडू अडवताना त्याने सूर मारला. तेव्हा त्याच्या कॉलरबोनमध्ये दुखापत झाली.

injured-morgan-and-billings-doubtful-for-playing-in-second-odi
पाहुण्या संघाच्या अडचणीत भर, इंग्लंडचे २ महत्त्वाचे खेळाडू जायबंदी
author img

By

Published : Mar 24, 2021, 3:40 PM IST

पुणे - भारताविरुद्ध कसोटी आणि टी-२० मालिका गमवल्यानंतर इंग्लंडचा संघ एकदिवसीय मालिकेत देखील १-० ने पिछाडीवर आहे. उभय संघातील दुसरा सामना २६ तारखेला खेळला जाणार आहे. या सामन्याआधी इंग्लंड संघाच्या अडचणीत भर पडली आहे. इंग्लंडचे दोन खेळाडू जखमी असून ते दुसरा सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्जला दुखापत झाली आहे. मॉर्गनच्या हाताचा अंगठ्या दुखापत झाली. तर दुसरीकडे बिलिंग्ज क्षेत्ररक्षण करता दुखापतग्रस्त झाला. चेंडू अडवताना त्याने सूर मारला. तेव्हा त्याच्या कॉलरबोनमध्ये दुखापत झाली.

दरम्यान सामना संपल्यानंतर मॉर्गन म्हणाला की, 'दुखापत कशी आहे, याची चाचपणी करण्यासाठी आम्हाला आणखी ४८ तास प्रतिक्षा करावी लागेल. शुक्रवारी होणाऱ्या सामन्यासाठी, उपलब्ध होण्याची आशा करण्यास, आम्हाला अधिकाधिक वेळ द्यावा लागेल.'

उभय संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने पहिला सामना ६६ धावांनी जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. उभय संघातील सामना इंग्लंडसाठी 'करो या मरो' या स्थितीतील आहे. तर दुसरीकडे भारताला सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे.

हेही वाचा - ICC Ranking : टी-२० क्रमवारीत विराटची आगेकूच, राहुलची घसरण

हेही वाचा - Ind vs Eng १st ODI : भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, कृणाल-कृष्णा पदार्पणात चमकले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.