एंटिगा - वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावले. या शतकी खेळी नंतर अंजिक्य भावूक झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने दोन वर्षानंतर शतक साकारले आहे.
अजिंक्यने या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात ८१ तर दुसऱ्या डावात १०२ धावा केल्या होत्या. आज रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अजिंक्य बोलत होता. तो म्हणाला, 'तो भावनिक क्षण होता. मी समजतो की १० वे शतक विशेष आहे. मी कोणत्याही सेलिब्रेशनबाबत विचार करत नव्हतो. मला हे शतक करायला दोन वर्षांचा अवधी लागला.'

पहिल्या डावात अजिंक्य जेव्हा मैदानात आला तेव्हा संघाची अवस्था ३ बाद २५ धावा अशी होती. त्यानंतर अजिंक्यने संघाचा डाव सावरला. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय फक्त १०० धावांत आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. शानदार फलंदाजी करणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले.