नवी दिल्ली - २००० ते २०१४पर्यंत भारताच्या वेगवान गोलंदाजीचा ताफा सांभाळणाऱ्या झहीर खानचा आज ४२वा वाढदिवस आहे. 'झॅक' असे टोपणनाव असलेल्या झहीरचा महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथे ७ ऑक्टोबर १९७८ला झहीरचा जन्म झाला. झहिरने २०००ला केनिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
-
Celebrating Zaheer Khan's birthday 🎊
— ICC (@ICC) October 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He was the joint-highest wicket-taker in the 2011 @cricketworldcup, picking up 21 in nine matches at 18.76 👏
WATCH his every wicket from the tournament 📽️ #BowlersMonth pic.twitter.com/Xifpd8UYna
">Celebrating Zaheer Khan's birthday 🎊
— ICC (@ICC) October 7, 2020
He was the joint-highest wicket-taker in the 2011 @cricketworldcup, picking up 21 in nine matches at 18.76 👏
WATCH his every wicket from the tournament 📽️ #BowlersMonth pic.twitter.com/Xifpd8UYnaCelebrating Zaheer Khan's birthday 🎊
— ICC (@ICC) October 7, 2020
He was the joint-highest wicket-taker in the 2011 @cricketworldcup, picking up 21 in nine matches at 18.76 👏
WATCH his every wicket from the tournament 📽️ #BowlersMonth pic.twitter.com/Xifpd8UYna
झहीरच्या वडिलांनी क्रिकेटमध्ये येण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले. त्यांनीच झहीरला अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून क्रिकेटला प्राधान्य देण्यास सांगितले होते. त्यानंतर झहीर मुंबईमध्ये ज्युनियर क्रिकेट खेळू लागला. तिथे चांगले प्रदर्शन केल्यानंतर, त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोदा संघाकडून संधी मिळाली. २०००-०१मध्ये रेल्वेविरुद्ध खेळलेल्या रणजी सामन्यात त्याने १४५ धावांमध्ये ८ बळी घेत सामनावीराचा मान पटकावला होता.
-
He's the fourth highest wicket taker for India in both Tests (311) and ODIs (282) - Happy Birthday to @ImZaheer! pic.twitter.com/71nJEhEtzZ
— ICC (@ICC) October 7, 2016 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">He's the fourth highest wicket taker for India in both Tests (311) and ODIs (282) - Happy Birthday to @ImZaheer! pic.twitter.com/71nJEhEtzZ
— ICC (@ICC) October 7, 2016He's the fourth highest wicket taker for India in both Tests (311) and ODIs (282) - Happy Birthday to @ImZaheer! pic.twitter.com/71nJEhEtzZ
— ICC (@ICC) October 7, 2016
२००४मध्ये बांगलादेशविरुद्ध ११व्या क्रमांकावर फलंदाजी करताना झहीरने ७५ धावा फटकावल्या होत्या. २००८मध्ये त्याला 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हल्ली क्रिकेटमध्ये वापरण्यात आलेला 'नकल बॉल' हे झहीरचे अस्त्र आहे. २०११च्या विश्वकरंडक स्पर्धेत त्याने 'नकल बॉल'चा वापर केला होता.
-
That moment when @ImZaheer registered his best ODI figures.
— BCCI (@BCCI) October 7, 2018 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Here's wishing a very Happy Birthday to one of #TeamIndia's finest pace bowlers 🎂💐 pic.twitter.com/wubxc1S2d6
">That moment when @ImZaheer registered his best ODI figures.
— BCCI (@BCCI) October 7, 2018
Here's wishing a very Happy Birthday to one of #TeamIndia's finest pace bowlers 🎂💐 pic.twitter.com/wubxc1S2d6That moment when @ImZaheer registered his best ODI figures.
— BCCI (@BCCI) October 7, 2018
Here's wishing a very Happy Birthday to one of #TeamIndia's finest pace bowlers 🎂💐 pic.twitter.com/wubxc1S2d6
भारतासाठी झहीरने ९२ कसोटी सामने खेळताना ३११ बळी घेतले. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २८२ बळी टिपले आहेत. भारताला २००३ मध्ये उपविजेता आणि २०११मध्ये विश्वविजेता बनवण्यामध्ये झहीरचा सिंहाचा वाटा आहे. झहीरने १५ ऑक्टोबर २०१५ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. झहीरने मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाडगेबरोबर २०१७मध्ये लग्न केले आहे. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात गोलंदाजी प्रशिक्षक आहे.