ETV Bharat / sports

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लड दौरा स्थगित - ind vs england upcoming series news

उभय संघांमध्ये टॉन्टन आणि ब्रिस्टल येथे दोन टी -२० तर वर्सेस्टर, चेल्म्सफोर्ड, सेंटरबरी आणि होव येथे चार एकदिवसीय सामने खेळले होते. ९ जुलै रोजी हा दौरा संपणार होता.

indian women's cricket team's england tour postponed
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लड दौरा स्थगित
author img

By

Published : Apr 24, 2020, 7:58 PM IST

लंडन - इंग्लंड आणि वेल्समध्ये १ जुलैपर्यंत क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जाणार नाहीत, असे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवारी जाहीर केले आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रस्तावित इंग्लंड २५ जूनपासून तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय संघ दोन आठवड्यांच्या इंग्लंड दौर्‍यावर चार एकदिवसीय आणि दोन टी -२० सामने खेळणार होता.

उभय संघांमध्ये टॉन्टन आणि ब्रिस्टल येथे दोन टी -२० तर वर्सेस्टर, चेल्म्सफोर्ड, सेंटरबरी आणि होव येथे चार एकदिवसीय सामने खेळले होते. ९ जुलै रोजी हा दौरा संपणार होता.

गुरुवारी ईसीबी बोर्डाच्या बैठकीत अनेक उपाययोजनांना मान्यता देण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या संदर्भात इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांचे वेळापत्रक जुलैपासून सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होईल. यात वेस्ट इंडिजसह कसोटी मालिकेचा समावेश आहे. त्याचबरोबर महिला संघाच्या भारत विरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहे.

त्याशिवाय द हंड्रेड टूर्नामेंटचे भवितव्य निश्चित करण्यासाठी ईसीबीची २९ एप्रिल रोजी बैठक होणार आहे. मंडळाने यापूर्वी ही स्पर्धा त्यांची प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.