बडोदा - आफ्रिकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाने विजय मिळवला आहे. कर्णधार मिताली राज आणि पूनम राऊत यांच्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने आफ्रिकेवर ५ गड्यांनी मात केली. या विजयासोबत मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली.
-
A good day on the field for #TeamIndia after wrapping up the 2nd ODI in great fashion. Final ODI in 3 days. See you there 🇮🇳🇮🇳 #TeamIndia #INDvSA @Paytm pic.twitter.com/It2OvThNTc
— BCCI Women (@BCCIWomen) October 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A good day on the field for #TeamIndia after wrapping up the 2nd ODI in great fashion. Final ODI in 3 days. See you there 🇮🇳🇮🇳 #TeamIndia #INDvSA @Paytm pic.twitter.com/It2OvThNTc
— BCCI Women (@BCCIWomen) October 11, 2019A good day on the field for #TeamIndia after wrapping up the 2nd ODI in great fashion. Final ODI in 3 days. See you there 🇮🇳🇮🇳 #TeamIndia #INDvSA @Paytm pic.twitter.com/It2OvThNTc
— BCCI Women (@BCCIWomen) October 11, 2019
हेही वाचा - टेनिस : वर्ल्ड नं. १ स्पर्धेबाहेर!..२१ वर्षाच्या सितसिपासची जोकोविचवर मात
या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी घेतली. त्यानंतर, मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या सलामीवीरांनी ७६ धावांची भागीदारी रचत चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या मिग्नोन डूप्रीझ (४४) व त्रिशा छेट्टी (२२) यांच्या धावांच्या जोरावर आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद २४७ केल्या.
या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. प्रिया पुनिया (२०) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (१८) स्वस्तात बाद झाल्यानंतर, अनुभवी मिताली राज आणि पूनम राऊत यांनी किल्ला लढवला. मितालीने आठ चौकारांसह ६६ धावा करताना एकदिवसीय कारकीर्दीतील ५३वे, तर पूनमने सात चौकारांच्या साथीने ६५ धावा करताना कारकीर्दीतील १२वे अर्धशतक पूर्ण केले. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यामुळे हरमनप्रीत कौर (नाबाद ३९) आणि यष्टीरक्षक तानिया भाटिया (नाबाद ८) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने ३ बळी टिपले आहेत.