दुबई - भारताचे पंच नितीन मेनन यांना इंग्लंडच्या नायजेल लाँग यांच्या जागी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये स्थान देण्यात आले आहे. 2020-21 हंगामासाठी मेनन यांची ही निवड करण्यात आली. आयसीसीचे महाप्रबंधक जोफ एलेर्डीस (अध्यक्ष), माजी खेळाडू व समालोचक संजय मांजरेकर आणि सामना रेफरी रंजन मदुगले आणि डेव्हिड बून यांच्या निवड समितीने मेनन यांची निवड केली.
36 वर्षीय मेनन यांना 3 कसोटी, 24 एकदिवसीय आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी करण्याचा अनुभव आहे. माजी कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन आणि सुंदरम रवी यांच्यानंतर ते या यादीत सामील होणारे तिसरे भारतीय आहेत.
-
Nitin Menon has been included in the Emirates ICC Elite Panel of Umpires for the 2020-21 season.
— ICC (@ICC) June 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
READ 👇
https://t.co/erAx5PCU0U
">Nitin Menon has been included in the Emirates ICC Elite Panel of Umpires for the 2020-21 season.
— ICC (@ICC) June 29, 2020
READ 👇
https://t.co/erAx5PCU0UNitin Menon has been included in the Emirates ICC Elite Panel of Umpires for the 2020-21 season.
— ICC (@ICC) June 29, 2020
READ 👇
https://t.co/erAx5PCU0U
मेनन यापूर्वी अमिरातीच्या आयसीसी आंतरराष्ट्रीय पंचांच्या पॅनेलचा भाग होते. या निवडीबद्दल मेनन म्हणाले, "एलिट पॅनेलमध्ये स्थान मिळवणे ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे. जगातील आघाडीच्या पंच आणि रेफरी यांच्याबरोबर नियमितपणे काम करणे हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे."