ETV Bharat / sports

सलग तिसऱ्यांदा भारताने पटकावली टेस्ट चॅम्पियनशिपची गदा

author img

By

Published : Apr 1, 2019, 6:17 PM IST

भारतीय कसोटी संघाला 1 मिलियन अमेरिकन डॉलरचे बक्षीस

Virat Kohli

दुबई - भारतीय कसोटी संघाने सलग तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून देण्यात येणारी टेस्ट चॅम्पियनशिपची गदा पटकावली आहे. यासोबत बक्षीस म्हणून आयसीसीकडून भारतीय कसोटी संघाला 1 मिलियन अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. कसोटीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखणाऱ्या संघाला हा मान मिळतो.

सध्याच्या कसोटी क्रमवारीत भारताचासंघ 116 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. 108 गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिका 105 गुण मिळवून तिसऱ्या स्थानी आहेत.

हा मान भारतीय संघाने परत मिळवल्याने मला अभिमान वाटतो, भारताच्या कसोटी संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याचाच हा गौरव असल्याचे कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

नुकतेच आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा कार्यभार स्वीकारणारे मनु साहनी यांनीही भारतीय कसोटी संघाचे अभिनंदन केले आहे.

Intro:Body:

spo 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.