नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान विराटने आपल्या वडिलांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण काढली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) विराटचे विधान ट्विट केले आहे.
छेत्रीशी बोलताना विराट म्हणाला, "माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगितले होते की तुम्ही खेळताना अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही 200 टक्के आत्मविश्वासाने म्हणाल की तुम्ही खेळात करिअर करू शकता तर तुम्ही पूर्णपणे सक्षम आहात. तेव्हा तुम्ही खेळावरच लक्ष केंद्रित करू शकता." विराट 18 वर्षांचा असताना त्याचे वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले होते.
-
Virat Kohli in successful chases ⬇️
— ICC (@ICC) May 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ODI innings: 86 | Runs: 5,388 | Avg: 96.21 🔥
T20I innings: 27 | Runs: 1,295 | Avg: 107.91 🤯
In a chat with 🇧🇩 captain Tamim Iqbal, he explained how the seeds of his brilliance were sowed at an early age. pic.twitter.com/nj3NsmenLI
">Virat Kohli in successful chases ⬇️
— ICC (@ICC) May 19, 2020
ODI innings: 86 | Runs: 5,388 | Avg: 96.21 🔥
T20I innings: 27 | Runs: 1,295 | Avg: 107.91 🤯
In a chat with 🇧🇩 captain Tamim Iqbal, he explained how the seeds of his brilliance were sowed at an early age. pic.twitter.com/nj3NsmenLIVirat Kohli in successful chases ⬇️
— ICC (@ICC) May 19, 2020
ODI innings: 86 | Runs: 5,388 | Avg: 96.21 🔥
T20I innings: 27 | Runs: 1,295 | Avg: 107.91 🤯
In a chat with 🇧🇩 captain Tamim Iqbal, he explained how the seeds of his brilliance were sowed at an early age. pic.twitter.com/nj3NsmenLI
विराट म्हणाला, ''कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्या वडिलांनी संघात निवड व्हावी, यासाठी लाच देण्यास नकार दिला होता. माझ्या वडिलांनी समोरच्या व्यक्तीला स्पष्ट सांगितले होते, की मेरिटवर निवड होणार असेल तर विराटची निवड करा. मी त्या व्यतिरिक्त काहीही देणार नाही.''
वडिलांची ही कृती आयुष्यात खूप काही देऊन गेली असल्याचे विराटने म्हटले आहे.