सेंट जोन्स - मुंबईचा अनुभवी लेगस्पिनर प्रवीण तांबे कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. सीपीएलमधील संघ त्रिनिबागो नाईट रायडर्समध्ये तांबे सामील झाला. शाहरुख खानच्या मालकीच्या या संघासाठी तांबे पुढच्या हंगामात खेळणार आहे.
-
Thus begins our race for #TheHomeRun!❤️🇹🇹#TKR 17-Member Squad for #CPL20: Pollard (c), DJ Bravo, DM Bravo, L Simmons, S Narine, C Munro, A Khan, K Pierre, T Seifert, T Webster, A Hosein, F Ahmed, A Phillip, A Jangoo, P Tambe, S Raza, J Seales⚡#CPLDraft @CPL #Cricket #CPL2020 pic.twitter.com/SgnhO2tkDd
— Trinbago Knight Riders (@TKRiders) July 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thus begins our race for #TheHomeRun!❤️🇹🇹#TKR 17-Member Squad for #CPL20: Pollard (c), DJ Bravo, DM Bravo, L Simmons, S Narine, C Munro, A Khan, K Pierre, T Seifert, T Webster, A Hosein, F Ahmed, A Phillip, A Jangoo, P Tambe, S Raza, J Seales⚡#CPLDraft @CPL #Cricket #CPL2020 pic.twitter.com/SgnhO2tkDd
— Trinbago Knight Riders (@TKRiders) July 6, 2020Thus begins our race for #TheHomeRun!❤️🇹🇹#TKR 17-Member Squad for #CPL20: Pollard (c), DJ Bravo, DM Bravo, L Simmons, S Narine, C Munro, A Khan, K Pierre, T Seifert, T Webster, A Hosein, F Ahmed, A Phillip, A Jangoo, P Tambe, S Raza, J Seales⚡#CPLDraft @CPL #Cricket #CPL2020 pic.twitter.com/SgnhO2tkDd
— Trinbago Knight Riders (@TKRiders) July 6, 2020
48 वर्षीय प्रवीण तांबे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शाहरूख खानचा संघ कोलकाता नाइट रायडर्सने तांबेला आपल्या संघात दाखल करून घेतले होते. पण नंतर टी-10 लीगमध्ये खेळल्याबद्दल आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने त्याला अपात्र ठरवले.
2018 मध्ये निवृत्त झाल्यानंतर तांबेने शारजाहमध्ये टी-10 लीग खेळली होती. या व्यतिरिक्त त्याने काही परदेशी टी-20 लीग स्पर्धाही खेळल्या होत्या. या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यामुळे तांबेवर ही कारवाई करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला इंडियन प्रीमियर लीगसह सर्व प्रकारच्या स्थानिक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावरच दुसर्या देशात स्थानिक टी-20 लीग खेळण्याची परवानगी आहे.
त्रिनिबागोने ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर फवाद अहमद याच्याशीही करार केला आहे. याशिवाय फ्रेंचायझीने न्यूझीलंडचा टिम सेफर्ट आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांच्याशीही करार केला आहे.