मुंबई - जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज आपल्या कारकिर्दीची १५ वर्षे पूर्ण केली. धोनीने २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र, त्यानंतर क्रिकेटप्रति निष्ठा आणि मेहनतीच्या जोरावर धोनीने स्वत:ला सिद्ध केले.
-
It's Bond, Super Bond for this 007 with his superfans everywhere he goes! This was at Jaipur right after the incredible #yellove win! #15YearsOfDhoni #WhistlePodu @msdhoni 🦁💛 pic.twitter.com/PUO2hYmykr
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">It's Bond, Super Bond for this 007 with his superfans everywhere he goes! This was at Jaipur right after the incredible #yellove win! #15YearsOfDhoni #WhistlePodu @msdhoni 🦁💛 pic.twitter.com/PUO2hYmykr
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 23, 2019It's Bond, Super Bond for this 007 with his superfans everywhere he goes! This was at Jaipur right after the incredible #yellove win! #15YearsOfDhoni #WhistlePodu @msdhoni 🦁💛 pic.twitter.com/PUO2hYmykr
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 23, 2019
हेही वाचा - IPL २०२० : ४८ वर्षीय प्रविण तांबेचे आयपीएल स्वप्न भंगणार
एक उत्कृष्ट कर्णधार, वेगवान यष्टीरक्षक आणि क्रिकेटच्या दुनियेतील 'चाणक्य' अशी धोनीची ओळख आहे. १९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर, २०११ मध्ये तब्बल २८ वर्षांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकरंडक उंचावला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने मारलेला अफलातून षटकार आणि रवी शास्त्री यांचे 'धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप' हे समालोचन आजही लोंकाना फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाते.
सचिन एकदा म्हणाला होता की, धोनी त्याच्याबरोबर खेळलेल्या सर्व कर्णधारांपैकी सर्वोत्तम आहे. सचिनचे हे शब्द धोनीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगून जातात.
-
To be a hero, you must sacrifice something and for @msdhoni it was family time as he tells us how tough it can be to balance 🏏and 👪 together.
— Star Sports (@StarSportsIndia) December 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Watch the #15YearsOfDhoni Special:
⌚️: Tomorrow 7 AM onwards
📺: Star Sports 1/1HD/1 Hindi/1HD Hindi. pic.twitter.com/1FxCNE5ZL8
">To be a hero, you must sacrifice something and for @msdhoni it was family time as he tells us how tough it can be to balance 🏏and 👪 together.
— Star Sports (@StarSportsIndia) December 22, 2019
Watch the #15YearsOfDhoni Special:
⌚️: Tomorrow 7 AM onwards
📺: Star Sports 1/1HD/1 Hindi/1HD Hindi. pic.twitter.com/1FxCNE5ZL8To be a hero, you must sacrifice something and for @msdhoni it was family time as he tells us how tough it can be to balance 🏏and 👪 together.
— Star Sports (@StarSportsIndia) December 22, 2019
Watch the #15YearsOfDhoni Special:
⌚️: Tomorrow 7 AM onwards
📺: Star Sports 1/1HD/1 Hindi/1HD Hindi. pic.twitter.com/1FxCNE5ZL8
धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत त्याने भारताकडून ३५१ एकदिवसीय सामने आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यांत भारतासाठी ४८७६ धावा, टी-२० मध्ये १०,७७३ एकदिवसीय आणि १६१७ धावा केल्या आहेत.
यंदा इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या संदर्भात तो अजूनही संघातील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे.