सिडनी - भारतीय संघाने हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांच्या चिवट खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी अनिर्णीत राखली. यानंतर क्रिकेट दिग्गजांसह क्रीडाप्रेमींमधून भारतीय संघावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. अशात भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ समोर आला आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तिसरा सामना संपल्यानंतरचा आहे. यात व्हिडीओत जबरदस्त कामगिरी केल्यानतर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन ड्रेसिंग रुममध्ये येताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे सर्वात प्रथम येत विहारी आणि अश्विन यांचे अभिनंदन करताना पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा तसेच इतर खेळाडूही यानंतर एकमेकांचे अभिनंदन करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील ऐतिहासिक सामन्यानंतर आम्ही तुमच्यासाठी ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ आणला आहे, असे कॅप्शन पोस्टसोबत देण्यात आले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवले होते. तेव्हा भारतीय संघाने कडवी झुंज देत हा सामना अनिर्णित राखला. उभय संघातील चार सामन्यांची मालिका १-१ असा बरोबरीत असून ब्रिस्बेन येथे अखेरचा चौथा कसोटी सामना होणार आहे.
हेही वाचा - हिटमॅन रोहितच्या 'विरुष्का'ला अनोख्या शुभेच्छा
हेही वाचा - भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त