नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटपटू, एकवेळचा सलामीवीर मुरली विजय तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्य खेळत आहे. या स्पर्धेत रुबी ट्रिकी वॉरियर्सकडून खेळताना तो चांगल्याच फॉर्मात आहे. स्पर्धेत त्याने डाव्या हाताने फलंदाजी केली. याच सामन्यात मैदानातच केलेल्या डान्समुळे विजय चर्चत आला आहे.
-
R Ashwin 🆚 M Vijay!
— TNPL (@TNPremierLeague) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The contest that was! Cricket is the winner! #NammaPasangaNammaGethu #TNPL2019 pic.twitter.com/Pqb5swNVHT
">R Ashwin 🆚 M Vijay!
— TNPL (@TNPremierLeague) August 4, 2019
The contest that was! Cricket is the winner! #NammaPasangaNammaGethu #TNPL2019 pic.twitter.com/Pqb5swNVHTR Ashwin 🆚 M Vijay!
— TNPL (@TNPremierLeague) August 4, 2019
The contest that was! Cricket is the winner! #NammaPasangaNammaGethu #TNPL2019 pic.twitter.com/Pqb5swNVHT
घडले असे, डिंडिगुल ड्रेगंस संघाविरुध्द रंगलेल्या सामन्यात मुरली विजय फलंदाजी करत होता. तेव्हा आश्विन १६ व्या षटक टाकण्यासाठी आला. त्यावेळी मैदानावर लावण्यात आलेल्या डीजेच्या तालावर विजयने हटके स्टाईलने डान्स सुरू केला. विजयचा डान्स पाहून प्रेक्षकांनाही हसू आले. सद्या विजयने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये रुबी ट्रिकी वॉरियर्सचा संघ अंकतालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. मात्र असे असले तरी मुरली विजयने या स्पर्धेत संघासाठी खोऱ्याने धावा केल्या आहेत.