लखनौ - दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.
-
Victory for South Africa 🔥
— ICC (@ICC) March 14, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
They pull off their highest successful run chase in women’s ODIs by defeating India by seven wickets.
They have also taken the series!#INDvSA ➡️ https://t.co/0gv3cNZlHj pic.twitter.com/MALQ72CjNU
">Victory for South Africa 🔥
— ICC (@ICC) March 14, 2021
They pull off their highest successful run chase in women’s ODIs by defeating India by seven wickets.
They have also taken the series!#INDvSA ➡️ https://t.co/0gv3cNZlHj pic.twitter.com/MALQ72CjNUVictory for South Africa 🔥
— ICC (@ICC) March 14, 2021
They pull off their highest successful run chase in women’s ODIs by defeating India by seven wickets.
They have also taken the series!#INDvSA ➡️ https://t.co/0gv3cNZlHj pic.twitter.com/MALQ72CjNU
लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी इकाना मैदानात झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर स्मृती मानधाना (१०) संघाची धावसंख्या १७ असताना बाद झाली. चांगल्या सुरूवातीनंतर प्रिया पुनियाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. ती वैयक्तिक ३२ धावांवर बाद झाली. तेव्हा भारताची अवस्था १६व्या षटकात २ बाद ६१ अशी झाली.
अनुभवी पूनम राऊतने कर्णधार मिताली राजच्या साथीने भारताचा डाव सावरला. पूनमने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. तिने १२३ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. तिला मिताली राजने ४५ तर हरमनप्रीत कौरने ५४ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ४ बाद २६६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तुमी सेखकुनेने सर्वाधिक २ बळी घेतले.
भारताने दिलेले लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४८.४ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या चारही फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. आफ्रिकेकडून सलामीवीर लिझेल लीने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. भारताकडून मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
दरम्यान, आजच्या सामन्यासह आफ्रिकेने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेचा पाचवा आणि अंतिम सामना १७ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.
हेही वाचा - IND Vs ENG २nd T0-२० : फलंदाजीत सुधारणेसह मालिकेत बरोबरी साधण्याचे भारतापुढे आव्हान
हेही वाचा - VHT २०२१ Final : मुंबईचा विजय हजारे करंडकावर कब्जा, अंतिम सामन्यात यूपीचा उडवला धुव्वा