ETV Bharat / sports

भारतीय महिला संघाचे निर्भेळ यश, वेस्ट इंडीजविरुध्दची टी-२० मालिका ५-० ने जिंकली

भारतीय महिलांनी अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघाचा ६१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिलांनी पाच सामन्यांची मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले.

http://10.10.50.85//maharashtra/18-November-2019/india-women-cricket-file_630_630_1811newsroom_1574059286_889.jpg
author img

By

Published : Nov 21, 2019, 12:50 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन - भारतीय महिलांनी अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघाचा ६१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय महिलांनी पाच सामन्यांची मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले.

India Women claim 5-0 T20 series sweep over West Indies
विजयानंतर भारतीय महिला क्रिकेटचा संघ....(फोटो- बीसीसीआय ट्विटर)

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ३ बाद १३४ धावा केल्या. सलामीवीर जोडी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना अनुक्रमे ९ आणि ७ धावांवर स्वस्तात बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रीग्ज आणि वेदा कृष्णमुर्ती या जोडीने भारताचा डाव सावरला. दोघींनी तिसऱ्या गडीसाठी शतकी भागिदारी केली. जेमिमाने ५६ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. तर वेदाने ४८ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. याच खेळींच्या जोरावर भारताने विडींजसमोर १३५ धावांचे लक्ष ठेवले.

प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजचा संघ निर्धारित २० षटकात ७ बाद ७३ धावा करु शकला. विंडीजकडून किशोना नाइट (२२) आणि शेमेन कॅम्प्बेल (१९) या दोघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून अनुजा पाटीलने भेदक गोलंदाजी करत ३ षटकात अवघ्या ३ धावा देत २ गडी बाद केले. तिला राधा यादव, पूनम यादव, पूजा वस्त्राकार आणि हर्लीन देओल यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत उत्तम साथ दिली. भारताने ६१ धावांनी हा सामना जिंकला.

हेही वाचा - ऐतिहासिक कसोटीपूर्वीच बांगलादेश अडचणीत, 'हा' खेळाडू दुखापतीने जायबंदी

हेही वाचा - गुलाबी चेंडूवर खेळण्यात आलेले आजपर्यंतचे सामने, कोणता संघ ठरला सरस; वाचा एका क्लिकवर...

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.