लखनौ - शफाली वर्माच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव झालेल्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात शानदार खेळ करत सामना जिंकला.
तिसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला ११२ धावा करता आल्या. त्यांनी ७ विकेटच्या बदल्यात ही धावसंख्या उभी केली. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अनुराधा रेड्डी, राधा यादव, दीप्ती शर्मा आणि सिमरन यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या ११३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात धडाक्यात झाली. शफाली आणि स्मृती मानधाना या दोघींनी ८.३ षटकात ९६ धावांची सलामी दिली. शफालीने या सामन्यात २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. भारताकडून टी-२० क्रिकेटमधील हे तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक आहे. शेफालीने ३० चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ६० धावा केल्या. परिणामी भारताने हा सामना ९ गडी राखून जिंकला. स्मृती मानधानाने २८ चेंडूत ४८ धावा काढत नाबाद राहिली.
हेही वाचा - ICC Ranking : टी-२० क्रमवारीत विराटची आगेकूच, राहुलची घसरण
हेही वाचा - प्रसिद्ध कृष्णा एकदिवसीय पदार्पणात 'अशी' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच गोलंदाज