तिरुवनंतपुरम - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने १९ धावा करताच विश्वविक्रमाला गवसणी घातली.
विराट टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ७४ टी-२० सामन्यात २५६३ धावा केल्या आहे. विशेष म्हणजे हा विक्रम भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माच्या नावे होता. विराटने रोहितचा हा विक्रम मोडीत काढत विश्वविक्रम आपल्या नावे केला.
विराटने ७४ सामन्यांत २५६३ धावा केल्या आहेत. तर रोहितने १०३ सामन्यात २५६३ धावा केल्या असून या यादीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरु आहे. पहिला सामना भारतीय संघाने ६ गडी राखून जिंकला. आता दुसरा सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला आहे.
- टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -
- २५६३ धावा - विराट कोहली
- २५६२ धावा - रोहित शर्मा
- २४३६ धावा - मार्टिन गप्टिल
- २२६३ धावा - शोएब मलिक
हेही वाचा - संजू..संजू...! घोषणाबाजीत 'लोकल बॉय' सॅमसनचे स्वागत, व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धेबाबत सौरव गांगुलींचे मोठं विधान
हेही वाचा - 'भावा!.. तो फटका जबरदस्त होता', कोहलीच्या 'विराट' खेळीची पीटरसनला भूरळ