तिरुवनंतपुरम - भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय संघाने निर्धारीत २० षटकात १७० धावा केल्या. दरम्यान, या सामन्यातही विराट कोहली आणि केसरिक विल्यम्स यांच्यात पुन्हा 'टशन' पाहायला मिळाली.
विराट १३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल्यम्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विराटची विकेट घेतल्यानंतर विल्यम्सने तोंडावर बोट ठेवत विराटला डिवचलं. पहिल्या सामन्यात विराटने नोटबूक साईन करताना दोन वर्षांपूर्वीचा वचपा काढला होता. त्याला विल्यम्सने पुन्हा उत्तर दिले.
![India vs West Indies, 2nd T20 : विराटला बाद केल्यानंतर विल्यम्सने दिली 'टशन'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5311023_jkrj.jpg)
विराटने या सामन्यात १९ धावा केल्या. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने ७४ सामन्यांत २५६३ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्मा १०३ सामन्यात २५६२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात विराट आणि विल्यम्समध्ये टशन पाहायला मिळाली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात या दोघांमधील द्वंद पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा - India vs West Indies, २nd T२०: रोहितला मागे टाकत विराटची विश्वविक्रमाला गवसणी
हेही वाचा - संजू..संजू...! घोषणाबाजीत 'लोकल बॉय' सॅमसनचे स्वागत, व्हिडिओ व्हायरल