इंदूर - भारतीय संघाने भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा पराभव केला. इंदूरच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताचा युवा गोलंदाज नवदीप सैनीने दोन गडी बाद करत सामनावीरचा पुरस्कार पटकावला.
हेही वाचा.... नाशिकचा हर्षवर्धन सदगीर नवा 'महाराष्ट्र केसरी'.. लातूरच्या शेळकेवर मात
श्रीलंकेच्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भाराताच्या लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी ७१ धावांची सलामी दिली. राहुल ४५ धावांवर बाद झाला. त्याला वानिंदु हसरंगाने त्रिफाळाचित केले. राहुल पाठोपाठ धवनलाही वानिंदु हसरंगाने (३१) माघारी धाडले.
राहुल आणि शिखर बाद झाल्यावर विराट कोहली आणि श्रेय्यस अय्यरने विजया दृष्टीक्षेपात आणला. पण संघाला विजयासाठी ६ धावांची गरज असताना अय्यर बाद झाला. अय्यरने २६ चेंडूंत ३४ धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतर विराट आणि ऋषभ पंत या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा श्रीलंकेच्या सलामीवीरांनी संघाला संथ सुरूवात करुन दिली. दोघांनी ४.५ षटकात ३८ धावांची सलामी दिली. त्यानंतर अविष्का फर्नांडोला (२२) बाद करत वॉशिंग्टन सुंदरने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. फर्नांडो बाद झाल्यानंतर कुलदीप यादवने कुशल परेरा (३४) आणि ओशादा फर्नांडोला (१०) माघारी धाडले.
श्रीलंकेच्या संघ कुलदीपच्या संघातून सावरत असताना नवदीप सैनीने दनुष्का गुणाथिलाका (२०) आणि भानुका राजपक्षे (९) यांना बाद केले. शार्दुल ठाकूरने एका षटकात तीन धावांत तीन फलंदाजांना बाद करत श्रीलंकेला मोठा धक्का दिला.
श्रीलंकेचा संघ कसाबसा १४२ धावा करु शकला. भारताकडून शार्दुल ठाकूरने ३, नवदीप सैनी-कुलदीप यादवने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी १-१ बळी घेतला.
हेही वाचा... महाराष्ट्र केसरी: दोस्तीत दोस्ती कुस्तीत कुस्ती...! हे फक्त महाराष्ट्रात घडू शकतं