पुणे - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये दुसऱ्या कसोटी सामना पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. दरम्यान, भारतीय संघाने, मयांकच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवसाअखेर ३ बाद २७३ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेसोबत कर्णधार विराट कोहली अर्धशतक झळकावत नाबाद आहे.
-
2nd Test. 85.1: K Rabada to A Rahane (18), 4 runs, 273/3 https://t.co/IMXND6IOWv #IndvSA @Paytm
— BCCI (@BCCI) October 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2nd Test. 85.1: K Rabada to A Rahane (18), 4 runs, 273/3 https://t.co/IMXND6IOWv #IndvSA @Paytm
— BCCI (@BCCI) October 10, 20192nd Test. 85.1: K Rabada to A Rahane (18), 4 runs, 273/3 https://t.co/IMXND6IOWv #IndvSA @Paytm
— BCCI (@BCCI) October 10, 2019
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात त्रिशतकी सलामी देणारी रोहित शर्मा आणि मयांकची जोडी यशस्वी ठरली नाही. संघाची धावसंख्या २५ असताना, रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. पहिल्या कसोटी सामन्यात दोनही डावात शतकं झळकावल्याने रोहितकडून अशाच खेळीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र कगिसो रबाडाने त्याला १४ धावांवर माघारी धाडले.
सलामीवीर रोहित शर्मा परतल्यानंतर, मयांक-पुजारा जोडीने खेळपट्टीवर जम बसवत भारतीय डावाला आकार दिला. दुसऱ्या गड्यासाठी दोन्ही फलंदाजांनी १३८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपले अर्धशतक पूर्ण केले.
-
That will be Stumps on Day 1 in Pune. #TeamIndia 273/3. Kohli 63*, Rahane 18*. Join us for Day 2 tomorrow #INDvSA @Paytm pic.twitter.com/78HYVJAD2g
— BCCI (@BCCI) October 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">That will be Stumps on Day 1 in Pune. #TeamIndia 273/3. Kohli 63*, Rahane 18*. Join us for Day 2 tomorrow #INDvSA @Paytm pic.twitter.com/78HYVJAD2g
— BCCI (@BCCI) October 10, 2019That will be Stumps on Day 1 in Pune. #TeamIndia 273/3. Kohli 63*, Rahane 18*. Join us for Day 2 tomorrow #INDvSA @Paytm pic.twitter.com/78HYVJAD2g
— BCCI (@BCCI) October 10, 2019
अखेर कगिसो रबाडाने चेतेश्वर पुजाराला बाद करत जमलेली जोडी फोडली. भारताने चहापानापर्यंत २ गडी गमावत १६८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मयांकची जोडी कर्णधार विराट कोहलीसोबत जमली.
मयांकने ५६ व्या शतकात आपले दुसरे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. मयांक-विराटची जोडी मोठी भागिदारी रचणार असे असताना रबाडाने ही जोडी फोडली. त्याने स्थिरावलेल्या मयांकला १०८ धावांवर बाद केले. मयांकने १९५ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ही खेळी साकारली.
त्यानंतर विराट आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवसाअखेर भारताला कोणतेही नुकसान होऊ दिले नाही. दोघांनी नाबाद १४७ चेंडूत ७५ धावांची नाबाद भागिदारी केली. पहिल्या दिवसाचा डाव संपला तेव्हा भारतीय संघाने ८५.१ षटकात ३ बाद २७३ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली (६३) आणि अजिंक्य रहाणे (१८) धावांवर नाबाद आहेत.
दरम्यान, पुण्याची खेळपट्टी पाहून भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात हनुमा विहारीला विश्रांती देत उमेश यादवला संघात संधी दिली आहे. अंधुक प्रकाशामुळे काही षटके बाकी असताना, पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय पंचानी घेतला.