विशाखापट्टणम - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये पहिला कसोटी सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला. कोहलीचा हा निर्णय सलामीवीराच्या भूमिकेत पहिल्यांदाच कसोटी मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत सार्थ ठरवला. दरम्यान, अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय पंचानी घेतला. तत्पूर्वी भारताने ५९.१ षटकात बिनबाद २०२ धावा केल्या आहेत.
- — BCCI (@BCCI) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— BCCI (@BCCI) October 2, 2019
">— BCCI (@BCCI) October 2, 2019
पहिल्यादांच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून मैदानात उतलेल्या रोहित शर्माच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. तेव्हा रोहितने त्या आपेक्षा पूर्ण करत १७४ चेंडूत ११५ धावांची नाबाद खेळी केली. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल या सलामी जोडीने ५९.१ षटकांत २०२ धावांची भागीदारी करून इतिहास घडवला.
रोहित शर्माने या दमदार खेळीत १२ चौकार आणि ५ षटकार लगावले आणि नाबाद ११५ धावा केल्या आहेत. तर मयांक अग्रवाल याने १८३ चेंडूत नाबाद ८४ धावा करत रोहितला चांगली साथ दिली. अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवत चहापानाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि पंचानी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.