पुणे - भारताने आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर आता पुण्याच्या गहुंजे मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने सावध सुरुवात केली. पहिल्या कसोटीत दोनही डावात शतकं झळकावलेला रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मयांक आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने भारताचा डाव सावरला.
पहिल्या डावाच्या पहिल्या सत्रात आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. या माऱ्यामुळे भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली नाही. या सत्रात भारतीय सलामीवीर मयांक अग्रवालवर आफ्रिकी गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा केला. यादरम्यान, एक चेंडू मयांकच्या हेल्मेटवर आदळला. तेव्हा भारतीय चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला.
-
WATCH: First the Knock, then the Punch for 4@mayankcricket got hit on the head off a bouncer, only to dispatch the next ball for a boundary.
— BCCI (@BCCI) October 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full video here 📹 https://t.co/oWG6FuCjIn #INDvSA pic.twitter.com/jRrOaupKs4
">WATCH: First the Knock, then the Punch for 4@mayankcricket got hit on the head off a bouncer, only to dispatch the next ball for a boundary.
— BCCI (@BCCI) October 10, 2019
Full video here 📹 https://t.co/oWG6FuCjIn #INDvSA pic.twitter.com/jRrOaupKs4WATCH: First the Knock, then the Punch for 4@mayankcricket got hit on the head off a bouncer, only to dispatch the next ball for a boundary.
— BCCI (@BCCI) October 10, 2019
Full video here 📹 https://t.co/oWG6FuCjIn #INDvSA pic.twitter.com/jRrOaupKs4
पहिल्या सत्रातील ११ व्या षटकात आफ्रिकी गोलंदाज नॉर्ट्जेने १४२ किलोमीटर वेगाने टाकलेला बाऊन्सर थेट मयांकच्या हेल्मेटवर आदळला. हा चेंडू यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकलाही रोखता आला नाही आणी चेंडू सीमारेषाबाहेर चौकार गेला. बाऊन्सरचा मारा होत असतानाही मयांकने संयमी खेळी केली. दरम्यान, त्या चेंडूमुळे मयांकला सुदैवाने कोणतीही इजा झालेली नाही.
हेही वाचा - Ind vs SA Live Update : मयांक अग्रवालची दुसऱ्या शतकाकडे वाटचाल, भारत २ बाद १६८
हेही वाचा - विराटनंतर मनीष पांडे करणार 'या' अभिनेत्रीशी लग्न