ETV Bharat / sports

'या' कारणामुळे कुलदीप, चहलला आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून वगळले - प्रसाद

आफ्रिका विरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी कुलदीप आणि चहलला संघात स्थान का देण्यात आले नाही. अशी विचारणा केली असता, त्यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी-२० विश्वकरंडक आहे. यामुळे भारतीय फिरकीपटू आक्रमणात वैविध्य यावे यासाठी आम्ही तरुण खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्नात आहोत. मागील २ वर्षांच्या काळात कुलदीप आणि चहलने मर्यादित षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी केली असून मर्यादित षटकांसाठी संघात चहल आणि कुलदीपचा नेहमी विचार करण्यात येईल. मात्र त्याआधी आम्ही नवीन खेळाडूंना संधी देत आहोत.

आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत कुलदीप, चहलला 'या' कारणाने वगळलं - प्रसाद
author img

By

Published : Sep 10, 2019, 5:35 PM IST

मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुध्द ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला आहे. या दोन संघामध्ये १५ सप्टेंबरपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच निवड समितीने टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात 'इन फॉर्म' कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले नाही. निवड समितीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत होते. मात्र, आता या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान का मिळाले नाही याचे कारण खुद्द निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - शाहरुखसोबत ब्राव्होचा लुंगी डान्स, पाहा व्हिडिओ

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद यांनी भारतीय संघाविषयी बातचित केली. यामध्ये त्यांनी आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेवरही भाष्य केले.

या दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी कुलदीप आणि चहलला संघात स्थान का देण्यात आले नाही. अशी विचारणा केली असता, त्यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी-२० विश्वकरंडक आहे. यामुळे भारतीय फिरकीपटू आक्रमणात वैविध्य यावे यासाठी आम्ही तरुण खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्नात आहोत. मागील २ वर्षांच्या काळात कुलदीप आणि चहलने मर्यादीत षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी केली असून मर्यादीत षटकांसाठी संघात चहल आणि कुलदीपचा नेहमी विचार करण्यात येईल. मात्र त्याआधी आम्ही नवीन खेळाडूंना संधीत देत आहेत. असं सांगत त्यांनी रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

हेही वाचा - भारतानेच श्रीलंकेच्या खेळाडूंना धमकावलं, पाक क्रीडामंत्र्यांचा आरोप

आफ्रिका विरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर आणि नवदीप सैनी.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.