मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केलं आहे. लोकांनी घराबाहेर पडू नका, ही कोरोनाविरुद्ध लढाई आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, असे आवाहन मोदी यांनी केलं आहे. यामुळे देशवासीय आपापल्या घरात कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत, अशा स्थितीत क्रीडा स्पर्धा बंद आहे. याकारणाने स्टार स्पोर्ट्स १ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे पुर्नप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही क्रिकेटप्रेमींसाठी मेजवाणी आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने आल्यास, सामना रोमाचंक ठरतो. आजही भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते आतूरतेने वाट पाहत असतात. क्रिकेटप्रेमींच्या आठवणींच्या संग्रहात या सामन्यांना विशेष स्थान आहे.
ही बाब ओळखून स्टार स्पोर्ट्स १ वाहिनीने भारत-पाकमधील ५० षटकाचे, विश्वकरंडकातील सामने पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात स्टार स्पोर्ट्सने ट्विटकरुन माहिती दिली आहे. याची सुरुवात ४ एप्रिलपासून होणार आहे.
हेही वाचा - शाब्बास..! कोरोनाशी लढण्यासाठी १५ वर्षाच्या शूटरने सेव्हिंग्समधून दिली 'इतकी' रक्कम
हेही वाचा - कोरोना : ऑस्ट्रेलिया 'बॉर्डर' बंद, टी-२० विश्वकरंडकासह भारताचा दौरा अडचणीत