मुंबई - भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेनंतर उभय संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईकर सूर्यकुमार यादवला भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. तसेच आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची देखील भारतीय संघात वर्णी लागली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –
- 23 मार्च – पहिला सामना
- 26 मार्च – दुसरा सामना
- 28 मार्च – तिसरा सामना
(सर्व सामने पुण्यात खेळवले जाणार आहेत)
हेही वाचा - Ind vs Eng ४th t-२० : भारताची मालिकेत बरोबरी; इंग्लंडवर मिळवला निसटता विजय
हेही वाचा - Ind vs Eng ४th t-२० : भारताची मालिकेत बरोबरी; इंग्लंडवर मिळवला निसटता विजय