इंदूर - सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवालच्या दमदार द्विशतकी खेळीमुळे भारताने दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशविरूद्ध ३४३ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. त्रिशतकाकडे कूच करणाऱ्या मयांकला मेहदी हसनने २४३ धावांवर बाद केले. बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मयांकने ३३० चेंडूंत २८ चौकार आणि ८ षटकार ठोकले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ६ बाद ४९३ धावा झाल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा ६० तर, उमेश यादव २५ धावांवर खेळत होते.
-
There is no stopping this fella. @mayankcricket brings up his 2nd Double 💯 with a Maximum 🔥 pic.twitter.com/aI21CyAdYn
— BCCI (@BCCI) November 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">There is no stopping this fella. @mayankcricket brings up his 2nd Double 💯 with a Maximum 🔥 pic.twitter.com/aI21CyAdYn
— BCCI (@BCCI) November 15, 2019There is no stopping this fella. @mayankcricket brings up his 2nd Double 💯 with a Maximum 🔥 pic.twitter.com/aI21CyAdYn
— BCCI (@BCCI) November 15, 2019
इंदूरच्या होळकर मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने १ बाद ८६ धावांवरून पुढे खेळताना आज भारताने चेतेश्वर पुजाराला लवकर गमावले. संघाच्या १०५ धावा झाल्या असताना गोलंदाज अबू जैदने त्याला ५४ धावांवर बाद केले. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार लगावले. पुजारा बाद झाल्यानंतर, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि मयांक अग्रवालने भारताच्या डावाला आकार दिला. संघाच्या तीनशे धावा पार झाल्या असताना रहाणे अबू जैदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचे शतक अवघ्या १४ धावांनी हुकले. रहाणेने १७२ चेंडूंचा सामना करत ९ चौकारांसह ८६ धावा केल्या.
संघाची धावसंख्या चारशेच्या पार गेली असताना मयांक बाद झाला. त्यानंतर आलेला वृद्धिमान साहाही लवकर तंबूत परतला. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने उमेश यादवला साथीला घेत संघाची धावसंख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचवली. जडेजाने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावांची तर, उमेश यादवने १ चौकार आणि ३ षटकारांसह २५ धावांची नाबाद खेळी केली आहे. बांगलादेशकडून गोलंदाज अबू जैदने सर्वाधिक चार बळी तर, मेहदी हसन आणि एबादत हुसेन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला आहे.
हेही वाचा - टीम इंडिया गोलंदाजीत 'हिरो', क्षेत्ररक्षणात ठरली 'झिरो'
तत्पूर्वी, बांगलादेश संघाचा कर्णधार मोमीनूल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मोमीनूलच्या हा निर्णय बांगलादेशच्या अंगउलट आला. भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला. उपहारापर्यंत बांगलादेशची अवस्था ३ बाद ६३ अशी झाली होती. अश्विनने त्यात चौथा धक्का देत बांगलादेशची अवस्था ४ बाद ९९ अशी केली. यानंतर लागलेली गळती थांबलीच नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ ५८.३ षटकात १५० धावांवर आटोपला. बांगलादेशच्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहित सहा धावांवर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहलीही खाते न उघडताच तंबूत परतला.
भारतीय संघ -
मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा.
बांगलादेशचा संघ -
इम्रुल काइस, शाद्मन इस्लाम, मोहम्मद मिथुन, मोमिनुल हक (कर्णधार), मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन, तैझुल इस्लाम, अबू जैद आणि एबादत हुसेन.