कोलकाता - भारत विरुध्द बांगलादेश संघामध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात दिवस-रात्र कसोटी सामना रंगला आहे. बांगलादेशला पहिल्या डावात १०६ धावांवर गुंडाळल्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे २७ वे शतक ठरले. त्याला अजिंक्य रहाणेनं अर्धशतकी खेळी करताना चांगली साथ दिली. पाहा विराटच्या शतकी खेळीचा व्हिडिओ....
-
Watch: @imVkohli's sensational century lights up Eden 💫💫
— BCCI (@BCCI) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full video here 📹https://t.co/u56jk5LJKa #PinkBallTest pic.twitter.com/uKRRRgO4xa
">Watch: @imVkohli's sensational century lights up Eden 💫💫
— BCCI (@BCCI) November 23, 2019
Full video here 📹https://t.co/u56jk5LJKa #PinkBallTest pic.twitter.com/uKRRRgO4xaWatch: @imVkohli's sensational century lights up Eden 💫💫
— BCCI (@BCCI) November 23, 2019
Full video here 📹https://t.co/u56jk5LJKa #PinkBallTest pic.twitter.com/uKRRRgO4xa
भारतीय संघाने आपला पहिला डाव ९ बाद ३४७ धावांवर घोषित केला. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांत संपवल्यानंतर भारताने २४१ धावांची आघाडी घेतली आहे. कोहली माघारी परतल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. तैजूल इस्लामने अफलातून झेल घेत कोहलीची खेळी संपुष्टात आणली. विराटने १९४ चेंडूत १३६ धावा केल्या. यामध्ये त्याने १८ चौकार ठोकले.
भारत आणि बांगलादेश संघात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. इंदूर येथील पहिला सामना भारतीय संघाने १ डाव १३० धावांनी जिंकला. त्यानंतर कोलकाता येथील कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात भारतीय संघ आहे.
हेही वाचा - IND Vs BAN D/N Test 2nd Day: भारताचा पहिला डाव ३४७ धावांवर घोषित
हेही वाचा - ऐतिहासिक शतकासह विराटने साधली रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी