नवी दिल्ली - बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या स्पर्धेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू साकिब अल हसनकडे देण्यात आले आहे.
भारत आणि बांगलादेश संघात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
-
Bangladesh 15-man squad for the T20I series against India.#BANvInd #T20I pic.twitter.com/Sy5gAY2D1r
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bangladesh 15-man squad for the T20I series against India.#BANvInd #T20I pic.twitter.com/Sy5gAY2D1r
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 17, 2019Bangladesh 15-man squad for the T20I series against India.#BANvInd #T20I pic.twitter.com/Sy5gAY2D1r
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 17, 2019
भारत दौऱ्यातील या मालिकेचा पहिला सामना ३ नोव्हेंबरला दिल्लीच्या मैदानात रंगणार आहे. त्यानंतर दुसरा सामना ७ नोव्हेंबरला राजकोटच्या मैदानात, तर तिसरा सामना १० नोव्हेंबरला नागपूरमध्ये खेळला जाईल. दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा २४ तारखेला करण्यात येणार आहे.
-
Fixture of 3-match T20I series between Bangladesh and India.#BANvIND #T20I pic.twitter.com/1GLv59ywAV
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Fixture of 3-match T20I series between Bangladesh and India.#BANvIND #T20I pic.twitter.com/1GLv59ywAV
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 17, 2019Fixture of 3-match T20I series between Bangladesh and India.#BANvIND #T20I pic.twitter.com/1GLv59ywAV
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 17, 2019
बांग्लादेशची टी-२० संघ -
शाकिब अल हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान आणि सफीउल इस्लाम.
हेही वाचा - Exclusive : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी 'ईटीव्ही भारत'ची बातचित पाहा...
हेही वाचा - गांगुली म्हणतो, 'या' दोन व्यक्ती ठरवू शकतात भारत विरुध्द पाकिस्तानचा सामना