इंदूर - होळकर मैदानात रंगलेल्या भारत विरुध्द बांगलादेश संघातील कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावे राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १५० धावात रोखले. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने २६ षटकात १ बाद ८६ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (४३) आणि मयांक अग्रवाल (३७) धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
A solid 72 run-partnership between Mayank (37*) & Pujara (43*) as #TeamIndia close Day 1 on 86/1 after bowling Bangladesh out for 150.
— BCCI (@BCCI) November 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/0aAwHDwHed #INDvBAN pic.twitter.com/q2uhSBW5j3
">A solid 72 run-partnership between Mayank (37*) & Pujara (43*) as #TeamIndia close Day 1 on 86/1 after bowling Bangladesh out for 150.
— BCCI (@BCCI) November 14, 2019
Scorecard - https://t.co/0aAwHDwHed #INDvBAN pic.twitter.com/q2uhSBW5j3A solid 72 run-partnership between Mayank (37*) & Pujara (43*) as #TeamIndia close Day 1 on 86/1 after bowling Bangladesh out for 150.
— BCCI (@BCCI) November 14, 2019
Scorecard - https://t.co/0aAwHDwHed #INDvBAN pic.twitter.com/q2uhSBW5j3
बांगलादेशच्या १५० धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहित सहा धावांवर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
बांगलादेश संघाचा कर्णधार मोमीनूल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मोमीनूलच्या हा निर्णय बांगलादेशच्या अंगलट आला. भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला. उपहारापर्यंत बांगलादेशची अवस्था ३ बाद ६३ अशी झाली होती. अश्विनने त्यात चौथा धक्का देत बांगलादेशची अवस्था ४ बाद ९९ अशी केली. यानंतर लागलेली गळती थांबलीच नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ ५८.३ षटकात १५० धावांवर आटोपला.
बांगलादेशकडून मोमिनूल हक ( ३७) आणि मुश्फिकर रहीम (४३) यांनी संघर्ष केला. मोहम्मद शमी, आर अश्विन यांच्यासह भारताच्या अन्य गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बांगलादेशने सपशेल शरणागती पत्करली. भारताकडून शमीने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवने प्रत्येकी २ गडी बाद केले.
भारतीय संघ -
मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा.
बांगलादेशचा संघ -
इम्रुल काइस, शाद्मन इस्लाम, मोहम्मद मिथुन, मोमिनुल हक (कर्णधार), मुश्फिकुर रहीम, महमुदुल्ला, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन, तैझुल इस्लाम, अबू जैद आणि एबादत हुसेन.