ETV Bharat / sports

India vs Australia : विराटसह 'हे' खेळाडू ठरले पराभवाचे 'खलनायक' - india vs australia 1st odi at mumbai

ऑस्ट्रेलियाने भारताचे लक्ष्य बिनबाद आणि ७४ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर (१२८) आणि फिंच (११०) यांनी नाबाद शतकं झळकावली. दरम्यान, भारताच्या या लाजिरवाण्या पराभवात कोणते खेळाडू 'खलनायक' ठरले वाचा...

india vs australia : six villain of team india to biggest loss 1st odi at mumbai
India vs Australia : विराटसह 'हे' खेळाडू ठरले भारताच्या पराभवाचे 'खलनायक'
author img

By

Published : Jan 15, 2020, 10:35 AM IST

Updated : Jan 15, 2020, 11:21 AM IST

मुंबई - ऑस्ट्रेलिया संघाने मुंबईत खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियन कर्णधार ‌अ‌ॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा भारतीय संघ ४९.१ षटकात सर्वबाद २५५ धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाने भारताचे लक्ष्य बिनबाद आणि ७४ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर (१२८) आणि फिंच (११०) यांनी नाबाद शतकं झळकावली. दरम्यान, भारताच्या या लाजिरवाण्या पराभवात कोणते खेळाडू 'खलनायक' ठरले वाचा...

विराट कोहली -
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमात बदल केला. त्याने रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल यांना अंतिम संघात स्थान दिले. तो स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. या सामन्यात त्याला १६ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‌ॅडम झंम्पाने त्याला माघारी धाडले.

india vs australia : six villain of team india to biggest loss 1st odi at mumbai
विराट कोहली...

श्रेयस अय्यर -
चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहिले जात असलेला श्रेयस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरला. त्याने टी-२० सामन्यात चमकदार कामगिरी केली. मात्र, एकदिवसीय सामन्यात त्यांची 'टांय-टांय फिस..' झाली. या सामन्यात तो पाचव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला आणि त्याला फक्त ४ धावा करता आल्या. मिचेल स्टार्कने त्याला बाद केले.

श्रेयस अय्यर...

ऋषभ पंत -
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून सध्या युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे पाहिले जात आहे. त्याला इतरांपेक्षा जास्त संधीही देण्यात येत आहेत. मात्र, त्या संधीचे सोने करण्यात पंत अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पंत मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने या सामन्यात ३३ चेंडूत २८ धावांचे योगदान दिले. पॅट कमिन्सने त्याला टर्नरकरवी झेलबाद केले.

ऋषभ पंत...

जसप्रीत बुमराह -
दुखापतीनंतर संघात परतलेल्या जसप्रीतकडून चांगल्या कामगिरीची आपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जसप्रीतच्या गोलंदाजी फोडून काढली. जसप्रीतने या सामन्यात ७ षटके गोलंदाजी केली. यात त्याने ७.१४ च्या इकोनॉमीने ५० धावा दिल्या.

जसप्रीत बुमराह...

शार्दुल ठाकूर -
शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीचा वॉर्नर-फिंच या जोडीने खरपूस समाचार घेतला. दोघांनी शार्दुलच्या ५ षटकात ४३ धावा झोडपल्या.

शार्दुल ठाकूर...

मोहम्मद शमी -
भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी या सामन्यात निप्रभ ठरला. त्याने या सामन्यात ७.४ षटकात ५८ धावा बहाल केल्या.

मोहम्मद शमी...

Intro:Body:

spo

Conclusion:
Last Updated : Jan 15, 2020, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.