मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलिया संघाने गुडघे टेकले. पण या सामन्यात टीव्ही पंचाने एक निर्णय दिला. त्यावर शेन वॉर्नसह बर्याच माजी खेळाडूंनी टीका केली आहे.
काय आहे प्रकरण
सामन्याच्या पहिल्या डावात 55 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमरून ग्रीन हा चेंडू टोलावून धाव घेण्यासाठी धावला पण त्याने अचानक आपला निर्णय बदलला. तेव्हा नॉन स्ट्राईक एन्डला उभा असलेला टीम पेन आणि ग्रीन यांच्यात मिस कम्यूनिकेशन झाले. यानंतर टीम पेन धाव घेण्यासाठी पळाला. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवून तो चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे फेकला. पंतने तो चेंडू पकडत यष्ट्ट्या उडवल्या.
पंतने यानंतर जोरदार अपील केली. तेव्हा मैदानावरिल पंचांनी हा निर्णय टीव्ही पंचाकडे सोपवला. टीव्ही पंचाने रिप्ले पाहत टीम पेनला नाबाद घोषित केले. पण टीव्ही रिप्लेमध्ये टीम पेनची बॅट रेषेवर असल्याचे स्पष्ट दिसत होते. नियमानुसार, जर कोणत्या फलंदाजाची बॅट रेषेवर असेल आणि तर तो बाद ठरवला जातो. पण टीव्ही पंचाने टीम पेनला नाबाद ठरवले. तेव्हा अनेकांनी पंचाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.
काय म्हणाला शेन वॉर्न
टीम पेनला नाबाद ठरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने एक ट्विट केले आहे. मी तिसऱ्या पंचाने टीम पेनला धावबाद दिले नाही, हे पाहून हैरान आहे. माझ्या मते, टीम पेनची बॅट क्रीझमध्ये पोहोचलेलीच नव्हती, असे वॉर्नने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
वसीम जाफरने मारला टोमणा
भारताचा माजी क्रिकेटर वसीम जाफरने देखील पंचाच्या या निर्णयावरून टोमणा मारला आहे. जाफरने आपल्या मजेदार शैलीत एक मिम्स शेअर या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा - Boxing Day Test : लाबूशेन याने केलं भारतीय गोलंदाजांचे कौतूक, म्हणाला...
हेही वाचा - IND Vs AUS : विराट भारतात मन मात्र ऑस्ट्रेलियात; पहिल्या दिवसाच्या खेळावर दिली 'ही' प्रतिक्रिया