नागपूर - पहिल्या सामन्यात केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीच्या धमाकेदार खेळींच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. आज नागपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ सलग दुसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
-
The first ODI of the series saw India get back to winning ways, and as the action moves to Nagpur, Australia will most certainly be looking towards improving their batting returns.#INDvAUS PREVIEW ⬇️https://t.co/CozIAaBDQk pic.twitter.com/GyZyfKbvxu
— ICC (@ICC) March 5, 2019
पहिल्या सामन्यात भारताला सहजासहजी विजय मिळाला नव्हता. ४ बाद ९९ अशा परिस्थितीतून केदार जाधव ८१ आणि धोनी ५९ धावा यांनी पाचव्या गड्यासाठी १४१ धावांची विक्रमी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या विजयामुळे भारताची मधल्या फळीची चिंता दूर झाली आहे.कर्णधार विराट कोहली दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी फलंदाजीत बदल करण्याची शक्यता दिसत नाही. शिखर धवन आणि रायुडु वगळल्यास सर्व फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. वेगवान गोलंदाजीत बुमराह आणि मोहम्मद शम्मी यांचे खेळणे निश्चित असून आजच्या सामन्यात कुलदीप किंवा जडेजा यांच्या जागी युझवेंद्र चहलला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे.कर्णधार अॅरोन फिंच फॉर्मात नसणे, ही ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब आहे. संघातील इतर फलंदाजांनी धावा केल्या परंतु, धावांची गती वाढवण्यास ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अपयश आले होते. गोलंदाजीत पॅट कमिन्स, जेसन बेहरनडॉर्फ आणि नथन कुल्टर-नाइल चांगली गोलंदाजी करत आहेत. फिरकी गोलंदाजीत पहिल्या सामन्यात अॅडम झॅम्पा अपयशी ठरला होता.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, अंबाती रायुडु, विजय शंकर, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, सिद्धार्थ कौल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ
अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडोर्फ, अॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, पीटर हॅन्ड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सेवल, झाए रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टॉयनिस, अॅश्टन टर्नर आणि अॅडम झॅम्पा.