दुबई - भारताची युवा खेळाडू शेफाली वर्माने आयसीसी महिला टी-२० क्रिकेट फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. तिने आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. त्याचा तिला फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी शेफालीने मागील वर्षी झालेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान, पहिले स्थान काबिज केले होते.
आयसीसीने महिला टी-२० ची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात शेफालीने ७५० गुणांसह पहिले स्थान काबिज केलं आहे. तिने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी हिला मागे टाकले आहे.
भारतीय संघ आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेत आफ्रिकेने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. पण शेफालीने या मालिकेत शानदार कामगिरी केली. तिने पहिल्या सामन्यात २३ तर दुसऱ्या सामन्यात ४७ धावांची खेळी केली होती. तिला या कामगिरीचा क्रमवारीत फायदा झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लिजेल लीच्या क्रमवारीत देखील सुधारणा झाली आहे. लीने दुसऱ्या टी-२० सामन्यात ७० धावांची खेळी केली होती. ली तीन स्थानाच्या सुधारणेसह ११व्या स्थानी पोहोचली आहे. आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्ट ५ स्थानाच्या सुधारणेसह २४व्या स्थानी विराजमान झाली आहे.
भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत सुधारणा -
दीप्ती शर्मा चार स्थानाच्या सुधारणेसह ४०व्या स्थानी पोहोचली आहे. तर ऋचा घोष ५९स्थानाच्या सुधारणेसह ८५व्या स्थानी विराजमान झाली आहे. गोलंदाजीत फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड ३४ वरून २५व्या स्थानी पोहोचली आहे.
एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी -
एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मिताली राज एका स्थानाच्या सुधारणेसह आठव्या स्थानी आहे. तर प्रिया पूनिया पाच स्थानाच्या सुधारणेसह ५३व्या स्थानी पोहोचली आहे. गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड ८ स्थानाच्या सुधारणेसह ३८व्या स्थांनी विराजमान झाली आहे.
हेही वाचा - Ind vs Eng : कृणाल-कृष्णाचे टीम इंडियात पदार्पण, पांड्या ब्रदर्स भावूक
हेही वाचा - Ind vs Eng : मायकल वॉनची भविष्यवाणी, म्हणाला 'हा' संघ ३-० ने मालिका जिंकेल