ETV Bharat / sports

सुपर ओव्हर न्यूझीलंडसाठी अशुभ, केनची कबुली... वाचा एका क्लिकवर संपूर्ण रेकॉर्ड

न्यूझीलंडने आजघडीपर्यंत ७ वेळा सुपर ओव्हरमध्ये सामना खेळला आहे. यात एकच सामना न्यूझीलंडला जिंकता आला आहे. राहिलेले ६ सामन्यात किवींना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

India inflict Super Over heartbreak on New Zealand: 6 losses in 7 tie-breakers
सुपर ओव्हर न्यूझीलंडसाठी अशुभ, केनची कबुली... वाचा एका क्लिकवर संपूर्ण रेकॉर्ड
author img

By

Published : Jan 29, 2020, 8:52 PM IST

हैदराबाद - न्यूझीलंडचा संघ सुपर ओव्हर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आजघडीपर्यंत ७ पैकी तब्बल ६ वेळा पराभूत झाला आहे. आज (बुधवार) भारतीय संघाने न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये मात दिली. दोनही संघांनी निर्धारीत २० षटकात समान १७९-१७९ धावा केल्या. यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १७ धावा केल्या. भारतीय रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडूवर १० धावांची गरज असताना रोहित शर्माने सलग दोन षटकार खेचले. पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सने सुपर ओव्हर आमच्यासाठी अशुभ आहे. यामुळे आम्हाला मुख्य सामन्यातच चांगली कामगिरी करावी लागणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

न्यूझीलंडने आजघडीपर्यंत ७ वेळा सुपर ओव्हरमध्ये सामना खेळला आहे. यात एकच सामना न्यूझीलंडला जिंकता आला आहे. राहिलेले ६ सामन्यात किवींना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. दरम्यान, इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेचा अंतिम सामनाही सुपर ओव्हरमध्ये गेला होता. न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यातील सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही दोनही संघांनी समान धावा केल्या. तेव्हा चौकाराच्या निकषाच्या जोरावर इंग्लंडला विजेता ठरवण्यात आले.

आजघडीपर्यंत न्यूझीलंडने खेळलेले सुपर ओव्हरचे सामने -

सामना विरोधी संघ सन ठिकाण निकाल
टी-२० भारत २०२० हॅमिल्टन पराभव
टी-२० इंग्लंड २०१९ ऑकलंड पराभव
एकदिवसीय इंग्लंड २०१९ लॉर्डस् पराभव
टी-२० वेस्ट इंडीज २०१२ पल्लेकेले पराभव
टी-२० श्रीलंका २०१२ पल्लेकेले पराभव
टी-२० ऑस्ट्रेलिया २०१० क्राइस्टचर्च विजय
टी-२० वेस्ट इंडीज २००८ ऑकलंड पराभव

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसरा सामना रंगतदार ठरला. मुख्य सामना 'टाय' ठरल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १७ धावा करत भारतासमोर विजयासाठी १८ धावांचे लक्ष्य ठेवले. तेव्हा भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

भारताला एकवेळ शेवटच्या दोन चेंडूत विजयासाठी १० धावांची गरज होती. तेव्हा रोहित शर्माने सलग दोन चेंडूंवर उत्तुंग षटकार ठोकून रोमांचक विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या विजयाचा 'हिरो' रोहित शर्मा सामनावीर ठरला. भारताने या 'सुपर' विजयासह ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० मालिकेत पराभूत केले आहे.

हेही वाचा - १०६ धावा करुनही विल्यम्सन शतकापासून वंचित, जाणून घ्या कारण...

हेही वाचा - IND VS NZ : सुपर ओव्हरमध्ये रोहितचे २ चेंडूवर २ षटकार, टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.