मुंबई - भारताचे माजी सलामीवीर आणि एक उत्तम रणजीपटू म्हणून ख्यातनाम असलेले माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे सहा वाजता ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. आपटे ८६ वर्षांचे होते. मुंबई संघाचे एक उत्तम रणजीपटू म्हणून माधव आपटेंची खास ओळख होती.
हेही वाचा - भारताविरूद्धच्या सामन्यात किलर मिलरने केली पाक खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी
५ ऑक्टोबर १९३२ मध्ये माधव आपटेंचा जन्म झाला होता. आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ मध्ये केली. आपटे यांनी १९५२- ५३ या काळात ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. विंडीजमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा १६३ धावांचा त्यांचा हा विक्रम १८ वर्ष अबाधित राहिला होता.
आपटे यांनी मुंबईकडून खेळताना रणजी क्रिकेटमध्ये २०७० धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ६ शतकांसह ६७ सामन्यांत ३३३६ धावा आहेत. क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी मुंबईचे नगरपालपद भूषविले होते. शिवाय, ते 'क्रिकेट क्लब ऑफ इंडिया'चे अध्यक्षही राहिले होते.