ETV Bharat / sports

भारतीय संघाने २ दिवसातच पाडला इंग्लंडचा फाडशा; जाणून घ्या कसोटीत इतिहासात किती वेळा असं घडलं

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात जिंकला. अहमदाबादमध्ये झालेल्या या डे-नाईट सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून धुव्वा उडवला.

india beat england in ahmedabad test only in 2 days know about all test ends on day2
भारतीय संघाने २ दिवसातच पाडला इंग्लंडचा फाडशा; जाणून घ्या कसोटीत इतिहासात किती वेळा असं घडलं
author img

By

Published : Feb 25, 2021, 8:55 PM IST

मुंबई - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात जिंकला. अहमदाबादमध्ये झालेल्या या डे-नाईट सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून धुव्वा उडवला. दरम्यान, ५ दिवसाचा कसोटी सामना दोन दिवसात संपल्याचं अनेकदा घडलं आहे.

अहमदाबाद डे-नाईट कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यानंतर लीच-रुट यांच्या फिरकी माऱ्यासमोर भारताचा डाव गडगडला आणि भारतीय संघ पहिल्या डावात १४५ धावांपर्यंत मजल मारू शकला. तेव्हा दुसऱ्या डावातही इंग्लंडचा संघ भारतीय फिरकीसमोर ढेपाळला. अश्विन-अक्षर जोडीने इंग्लंडला ८१ धावांत गुंडाळले आणि भारताला विजयासाठी ४९ धावांचे आव्हान मिळाले. तेव्हा रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने नाबाद राहत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने ११, अश्विन याने ७ आणि वॉशिंगटन सुंदर आणि इशांत शर्मा यान प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अवघ्या दोन दिवसात संपणारा हा २२ वा सामना आहे. याआधी २०१८ मध्ये भारतीय संघाने अफगाणिस्तानचा बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात दोन दिवसातच पराभव केला होता. त्याआधी सर्वप्रथम १८८२ मध्ये इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनच दिवसात विजय मिळवला होता. त्या सामन्यानंतर आतापर्यंत असे २१ सामने झाले आहेत, ज्यांचा निकाल २ दिवसात लागला आहे.

हेही वाचा - IND VS ENG ३rd Test : भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय

हेही वाचा - अश्विनने रचला इतिहास, सर्वात जलद ४०० विकेट घेणारा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.