ETV Bharat / sports

बास्केटबॉलसाठी श्रेयस अय्यर गाठणार अमेरिका

author img

By

Published : Feb 14, 2020, 4:05 PM IST

श्रेयस हा बास्केटबॉलचा चाहता आहे आणि या कारणास्तव तो ६९ व्या एनबीए ऑल स्टार वीकेंडचा भाग असेल.

India batsman Shreyas Iyer to  attend the 69th NBA All-Star Weekend in Chicago
बास्केटबॉलसाठी श्रेयस अय्यर गाठणार अमेरिका

शिकागो - भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान शिकागो येथे होणाऱया ६९ व्या एनबीए ऑल स्टार वीकेंडला उपस्थित राहणार आहेत. श्रेयस हा बास्केटबॉलचा चाहता आहे आणि या कारणास्तव तो या वीकेंडचा भाग असेल. १५ फेब्रुवारीला श्रेयस स्टेट फॉर्म ऑल-स्टार आणि १६ फेब्रुवारीला युनायटेड सेंटरमध्ये एनबीए ऑल-स्टार सामन्याचा भाग असेल.

हेही वाचा -सचिन-लारा वानखेडेवर भिडणार, ७ मार्चला रंगणार सामना

'या स्पर्धेचा मला आनंद झाला आहे. बास्केटबॉलमधील दिग्गजांना पाहणे हे माझे खूप पूर्वीचे स्वप्न होते आणि आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मी लेब्रॉन जोन्स आणि मी ड्वाइट हॉवर्ड सारख्या दिग्गजांचा चाहता आहे. मी या क्षणाची वाट पाहत आहे', असे श्रेयस म्हणाला.

एनबीए ऑल-स्टारचे आयोजन रविवारी होणार असून २०० पेक्षा जास्त देश आणि ४० हून अधिक भाषांमध्ये ही स्पर्धा प्रसारित केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.