नागपूर - भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघ नागपूर येथे दाखल झाले आहेत. नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर येत्या रविवारी तिसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही संघांनी मालिकेत बरोबरी साधली असल्याने हा सामना महत्त्वाचा असणार आहे.
हेही वाचा - फिरकीपटू अश्विन झाला 'दिल्लीकर', बदल्यात पंजाबला मिळाला 'हा' खेळाडू
बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने बांगलादेशला हरवून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. बांगलादेशने दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने आठ गडी राखून आणि 16 व्या षटकातच पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने केलेल्या ८५ धावांच्या योगदानामुळे भारताला हा विजय साध्य करता आला. उद्यापासून दोन्ही संघ नागपूर येथील मैदानावर सरावाला प्रारंभ करतील.