नवी दिल्ली - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण हा एक अतिशय धोकादायक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार खेळीतून अनेकदा भारतीय संघाला जिंकवून देणाऱ्या युसुफ पठाणने आज निवृत्तीची घोषणा केली. युसुफने ट्विटरवर एक निवेदन जाहीर करून क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचे सांगितले. २००७ चा टी-२० आणि २०११चा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता.
भारतीय संघासाठी अष्टपैलू युसुफ पठाणने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५७ सामने खेळताना ८१० धावा केल्या आहेत. या काळात त्याने गोलंदाजीतही ३३ बळी घेतले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याने २२ सामन्यात २३६ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या प्रकारात त्याच्या नावावर १३ बळींची नोंद आहे. त्याचवेळी आयपीएलमध्ये त्याने १७४ सामने खेळत ३२०४ धावा चोपल्या आहेत. तर, ४२ फलंदाजांना तंबुचा मार्ग दाखवला आहे.
-
I thank my family, friends, fans, teams, coaches and the whole country wholeheartedly for all the support and love. #retirement pic.twitter.com/usOzxer9CE
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) February 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I thank my family, friends, fans, teams, coaches and the whole country wholeheartedly for all the support and love. #retirement pic.twitter.com/usOzxer9CE
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) February 26, 2021I thank my family, friends, fans, teams, coaches and the whole country wholeheartedly for all the support and love. #retirement pic.twitter.com/usOzxer9CE
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) February 26, 2021
युसूफ पठाणचा धाकटा भाऊ इरफान पठाणही भारतीय संघाकडून खेळला आहे. जानेवारीत इरफानने निवृत्तीची घोषणा केली. अलीकडेच युसुफने हैदराबादमधील क्रिकेट अकादमी ऑफ पठाण (सीएपी) च्या २६व्या केंद्राचे उद्घाटन केले. शहरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे हे सीएपीचे उद्दीष्ट आहे.