हैदराबाद - भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धचा पहिला टी-२० सामना ६ गडी राखून जिंकला. विडींजने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हे लक्ष्य ६ चेंडू राखून सहज पूर्ण केले. यात विराटने नाबाद ९४, तर केएल राहुलने ६२ धावांची खेळी केली. भारतीय संघाने विजय मिळवला असला तरी या सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण गचाळ ठरले. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारताच्या क्षेत्ररक्षणावर टीका केली.
वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि खुद्द कर्णधार विराट कोहलीकडून 'मिस फिल्डिंग' झाली. याचा फायदा वेस्ट इंडीजच्या फलंदाजी घेतला आणि २०७ धावांचे लक्ष उभारले. भारताच्या क्षेत्ररक्षणावर युवराजने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब झाल्याची टीका केली.
-
India very poor on the field today ! Young guns reacting a bit late on the ball! Too much cricket ? ? Let’s get these runs come on lads
— yuvraj singh (@YUVSTRONG12) 6 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">India very poor on the field today ! Young guns reacting a bit late on the ball! Too much cricket ? ? Let’s get these runs come on lads
— yuvraj singh (@YUVSTRONG12) 6 December 2019India very poor on the field today ! Young guns reacting a bit late on the ball! Too much cricket ? ? Let’s get these runs come on lads
— yuvraj singh (@YUVSTRONG12) 6 December 2019
केएल राहुलने वेस्ट इंडीजचा डाव संपल्यानंतर क्षेत्ररक्षणाचे खापर मैदानातील लाईट्सवर फोडले. त्याच्या मते मैदानातील लाईट्स खूपच खाली लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे चेंडू दिसत नव्हता. दरम्यान, भारतीय संघ हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये अनेकवेळा खेळला आहे. यामुळे खेळाडूंना या मैदानाचा दांडगा अनुभव असून या चूका टाळता आल्या असता, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
भारत-वेस्ट इंडीज संघात तीन सामन्याची टी-२० मालिका सुरू असून पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. आता दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुवनंतपुरमच्या मैदानावर रंगणार आहे.
हेही वाचा - श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 'या' खेळाडूचे १० वर्षानंतर पुनरागमन
हेही वाचा - टी-२० मधील मोठ्या विक्रमात चहलने केली अश्विनची बरोबरी