ETV Bharat / sports

भारतीय संघाची विजयी आघाडी, तिसऱ्या टी-२० सामन्यात विडींजचा केला ७ गडी राखून पराभव - महिला क्रिकेट

भारतीय फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडीजचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद ५९ धावांच करु शकला. त्यानंतर रॉड्रिग्जच्या ५१ चेंडूंतील नाबाद ४० धावांच्या खेळीच्या बळावर भारताने हा सामना ३ फलंदाजांच्या मोबदल्यात आणि २० चेंडू राखून जिंकला.

भारतीय संघाची विजयी आघाडी, तिसऱ्या टी-२० सामन्यात विडींजचा केला ७ गडी राखून पराभव
author img

By

Published : Nov 16, 2019, 7:59 AM IST

गयाना - भारतीय महिला क्रिकेट संघाने सर्वच आघाड्यावर दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिज विरुध्दचा तिसरा टी-२० सामना ७ गडी राखून जिंकला. या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली. गोलंदाजांची सुरेख कामगिरी आणि जेमिमा रॉड्रिग्जची दमदार फटकेबाजी विजयाच्या जमेच्या बाजू ठरल्या.

भारतीय फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडीजचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद ५९ धावांच करु शकला. त्यानंतर रॉड्रिग्जच्या ५१ चेंडूंतील नाबाद ४० धावांच्या खेळीच्या बळावर भारताने हा सामना ३ फलंदाजांच्या मोबदल्यात आणि २० चेंडू राखून जिंकला.

वेस्ट इंडीजच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. विडिंजची सुरुवात खराब झाली. त्यांची आघाडीची फलंदाज हेली मॅथ्यूज (७), स्टेसी एन. किंग (७) आणि शेमाइल कॅम्पबेल (२) या स्वस्तात तंबूत परतल्या. वेस्ट इंडीजचा संघ ६ षटकांच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये फक्त १२ धावाच करू शकला. वेस्ट इंडीजकडून फक्त चेडीन नेशन (११) आणि चिनेली हेन्री (११) याच दोघींना दुहेरी आकडा गाठता आला. आणि वेस्ट इंडीजचा संघ २० षटकात ९ बाद ५९ धावा करु शकला. राधा यादव (२), दीप्ती शर्मा (२), पूनम यादव आणि अनुजा पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

वेस्ट इंडिजने दिलेल्या ५९ धावांच्या पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मागील दोन सामन्यात सलग दोन अर्धशतक झळकावणारी शेफाली वर्मा शून्यावर बाद झाली. अनुभवी स्मृती मानधनाही (३) स्वस्तात बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर ७ धावाच करू शकली.

तेव्हा, रॉड्रिग्जने दीप्ती शर्मासह दमदार खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडीजकडून हायली मॅथ्यूजने ७ धावांत २ गडी बाद केले. पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा - चेंडू कुरतडल्याने विंडीजच्या निकोलस पूरनवर ४ सामन्यांची बंदी

हेही वाचा - दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना 'या'वेळी अडचण भासू शकते - पुजारा

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.