ETV Bharat / sports

विराट ठरला 'असा' पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

विंडीजविरुद्धच्या मालिकेत मालिकावीरचा पुरस्कार पटकवल्यानंतर विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मालिकावीरचा पुरस्कार तब्बल ६ वेळा पटकावला. अशी कामगिरी करणारा विराट जगातील एकमेव खेळाडू आहे. या यादीत एकही खेळाडू सध्या विराटच्या जवळपास नाही.

ind vs wi : virat kohli win total 6 time mos award in t-20 cricket
विराट ठरला 'असा' पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू
author img

By

Published : Dec 12, 2019, 1:01 PM IST

मुंबई - भारतीय संघाने अखेरच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात विंडीजला ६७ धावांनी धूळ चारत मालिकेत २-१ अशी बाजी मारली. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा रोहित शर्मा, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी आक्रमक अर्धशतकं झळकावली. याच खेळींच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकात ३ बाद २४० धावांचा डोंगर उभारला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश करत विंडीजला ८ बाद १७३ धावांवर रोखलं. दरम्यान, या मालिकेत आश्वासक कामगिरी केलेल्या कर्णधार विराट कोहलीला 'मालिकावीर' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

विंडीजविरुद्धच्या मालिकेत मालिकावीरचा पुरस्कार पटकवल्यानंतर विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मालिकावीरचा पुरस्कार तब्बल ६ वेळा पटकावला. अशी कामगिरी करणारा विराट जगातील एकमेव खेळाडू आहे. या यादीत एकही खेळाडू सध्या विराटच्या जवळपास नाही. विराटनंतर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, बांगलादेशच्या साकीब अल हसन, पाकिस्तानचा बाबर आझम, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी ३ वेळा मालिकावीरचा पुरस्कार पटकावला आहे.

दरम्यान, भारताच्या २४१ धावांच्या खडतर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि केरॉन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीप यादवने हेटमायरचा अडसर दूर केला. दुसरीकडे केरॉन पोलार्डने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. मात्र, ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हार मानली. भारताकडून भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दीपक चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

हेही वाचा - कोहलीने षटकार ठोकत नोंदवला 'विराट' विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

हेही वाचा - IND VS WI: भारताचा मालिका विजय; निर्णायक सामन्यात विंडीजवर ६७ धावांनी मात

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.