ETV Bharat / sports

Ind vs WI : ईशांत शर्माची भेदक गोलंदाजी, भारत मजबूत स्थितीत - ishant sharma

वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात ईशांत शर्माने भेदक गोलंदाजी करत विंडीजचे ५ गडी तंबूत धाडले. यामुळे विंडीजची अवस्था दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद १७९ धावा अशी झाली आहे.

Ind vs WI : ईशांत शर्माची भेदक गोलंदाजी, भारत मजबूत स्थितीत
author img

By

Published : Aug 24, 2019, 1:50 PM IST

अँटिग्वा - वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात ईशांत शर्माने भेदक गोलंदाजी करत विंडीजचे ५ गडी तंबूत धाडले. यामुळे विंडीजची अवस्था दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद १७९ धावा अशी झाली आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अद्याप १०८ धावांनी पिछाडीवर आहे.

दुसऱ्या दिवशीचे हिरो ठरले भारतीय फलंदाज रविंद्र जडेजा आणि गोलंदाज ईशांत शर्मा. जडेजाने अर्धशतक झळकावत भारतीय संघाला सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली. तर गोलंदाजी ईशांत शर्माने ५ गडी बाद करुन सामन्यात भारताचे पारडे जड केले.

पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्वबाद २९७ धावा केल्या आहेत. यात अजिंक्य राहणे (८१) आणि रविंद्र जडेजा (५८) यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने सावध सुरुवात केली. सलामीवीर ब्रेथवेट आणि कँपबेल यांनी ३६ धावांची भागीदारी केली. तेव्हा मोहम्मद शमीने कँपबेलला २३ धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली. त्यानंतर ईशांत शर्माने भेदक गोलंदाजी केली आणि ४२ धावांमध्ये विंडीजचे ५ गडी बाद केले.

इशांतला बुमराह, शमी आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत साथ दिली. विंडीजकडून क्रेग ब्रेथवेट (१४), शमर ब्रुक्सला (३६), डेरेन ब्रावो (१८), रोस्टन चेज (४८) शाय होप(२४), हेटमायर(३५) धावा केल्या.

दुसऱ्या दिवसा अखेर कर्णधार जेसन होल्डर १० धावांवर तर मिग्युअल कमिन्स शून्य धावांवर नाबाद आहेत.

संक्षिप्त धावफलक -
भारत पहिला डाव - सर्वबाद २९७ धावा ( अजिंक्य राहणे (८१), रविंद्र जडेजा (५८), लोकेश राहुल (४४), हनुमा विहारी (३२), केमार रोच ४/६६

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.