हैदराबाद - वेस्ट इंडीज विरुध्द ६ डिसेंबर पासून सुरू होत असलेल्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. उभय संघात मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. यासाठी दोनही संघ हैदराबादमध्ये असून संघांनी सामन्यापूर्वी कसून सराव केला. भारतीय संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्या व्हिडिओत भारतीय संघ 'हटके' सराव करताना दिसत आहे.
भारतीय संघाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत खेळाडू धावण्याचा सराव करताना दिसत आहेत. चेंडू मैदानावरून वेगाने सीमारेषेच्या दिशेने जाताना चेंडूचा कसा पाठलाग करावा आणि तो कसा अडवावा यासाठी हा सराव सुरू असल्याचे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या सरावाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, भारत-वेस्ट इंडीज संघात तीन सामन्याची टी-२० मालिका आणि ३ सामन्याची एकदिवसीय मालिका होणार आहे.
भारत-वेस्ट इंडीज टी-२० मालिकेचे वेळापत्रक -
- ६ डिसेंबर - हैदराबाद
- ८ डिसेंबर - तिरुवनंतपुरम
- ११ डिसेंबर - मुंबई
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, संजू सॅमसन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार.
हेही वाचा - धोनी के आवाज में पेश है, जब कोई बात बिगड जाए...व्हिडिओ मात्र स्वतःच्या रिस्कवर पाहा
हेही वाचा - इंग्लंडचे महान गोलंदाज बॉब विलीस यांची 'एक्झिट'