नवी दिल्ली - वेस्ट इंडीज विरुध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी मराठमोळा केदार जाधवचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. केदार सध्या या मालिकेसाठी कसून सराव करत आहे. या सरावाचा एक फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. तेव्हा या फोटोवर भारतीय सलामीवीर रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
वेस्ट इंडीज मालिकेपूर्वी केदार जाधवने सराव करत असताना एक फोटो शेअर केला. त्यासोबत त्याने मैदानावर परत येऊन आणि मला जे आवडते ते करताना छान वाटत आहे, असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर रोहित शर्माने केदारला 'पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा' असा मजेशीर सल्ला दिला आहे.
- View this post on Instagram
Feels good to be back on the field and do what I like to do. 🏏🙂 #ranjitrophy @sareen_sports
">
रोहित अनेकवेळा केदारच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसून आला आहे. तसेच दोघांत अनेकदा तर मराठी संभाषणही पाहायलाही मिळाले आहे. केदार मागील काही महिन्यांपासून संघात परतण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याला मागील अनेक दिवसांपासून मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडीजविरुद्ध त्याला पुन्हा एकदा आपली लय परत मिळवण्याची संधी असणार आहे.
वेस्ट इंडीज विरुध्द टी-२० मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे.
हेही वाचा - विंडीजची नवी खेळी..भारताला रोखण्यासाठी संघासाठी नेमला भारतीय प्रशिक्षक!
हेही वाचा - VIDEO : मनीष पांडेच्या लग्नात युवराजचा भन्नाट डान्स, पाहा एकदा