तिरुवनंतपुरम - भारत आणि वेस्ट इंडीज संघातील दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडीजने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात धोनीच्या नावे जयघोष करणाऱ्या प्रेक्षकांवर कर्णधार विराट कोहली चिडला. त्याने हातवारे करत प्रेक्षकांवर आपला राग व्यक्त केला.
घडलं असं की, महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून ऋषभ पंतला पहिला जात आहे. मागील अनेक सामन्यात खराब कामगिरी करूनही पंत संघात कायम आहे. वेस्ट इंडीज विरुध्दच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने फलंदाजीत ३३ धावा केल्या. मात्र, त्यांची यष्टीमागील कामगिरी पुन्हा खराब ठरली. पंतने दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर झेल सोडला. त्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षकांनी पंतला धोनीच्या नावाने चिडवायला सुरुवात केली.
- — NISHANT BARAI (@maibhiengineer_) December 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— NISHANT BARAI (@maibhiengineer_) December 8, 2019
">— NISHANT BARAI (@maibhiengineer_) December 8, 2019
तेव्हा मात्र, सीमारेषेवर उभा असलेला विराट चिडला. त्याने पंतला का चिडवता, असा सवाल विचारत त्याची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अनेक संधी मिळूनही पंतला आपली छाप पाडता आलेली नाही. पंतसाठी पर्याय म्हणून बरेच युवा यष्टीरक्षक पॅड बांधून तयार असले तरी सातत्याने नापास होऊनही त्यालाच संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
-
Virat Kohli's reaction when crowd were booing Rishabh Pant. ❤️❤️ pic.twitter.com/TVpzHWoqaB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Virat Kohli's reaction when crowd were booing Rishabh Pant. ❤️❤️ pic.twitter.com/TVpzHWoqaB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2019Virat Kohli's reaction when crowd were booing Rishabh Pant. ❤️❤️ pic.twitter.com/TVpzHWoqaB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2019
हेही वाचा - शिवमला तिसऱ्या क्रमाकांवर का पाठवलं, विराटनं दिलं 'हे' स्पष्टीकरण
हेही वाचा - रणजी सामन्यात चक्क सापाची 'एन्ट्री'!..पाहा व्हिडिओ