ETV Bharat / sports

IND vs SA : कोरोना विषाणूच्या धास्तीने युजवेंद्र चहल मास्कमध्ये, शेअर केला फोटो

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलला कोरोना विषाणूची धास्ती वाटू लागली आहे. यामुळे तो मास्कमध्ये दिसून आला.

author img

By

Published : Mar 10, 2020, 7:26 PM IST

IND vs SA: Yuzvendra Chahal shares photo with face mask on due to coronavirus scare ahead of 1st ODI in Dharamsala
IND vs SA : कोरोना व्हायरसच्या धास्तीने युजवेंद्र चहल मास्कमध्ये, शेअर केला फोटो

धर्मशाळा - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार असून पहिला सामना धर्मशाळा येथे होणार आहे. या सामन्याआधी भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलला कोरोना विषाणूची धास्ती वाटू लागली आहे. यामुळे तो मास्कमध्ये दिसून आला. चहलने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून त्यात तो मास्क घातलेला दिसत आहे.

IND vs SA: Yuzvendra Chahal shares photo with face mask on due to coronavirus scare ahead of 1st ODI in Dharamsala
भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक....

भारत-दक्षिण आफ्रिकेचे संघ पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी धर्मशाळामध्ये दाखल झाले आहेत. यावेळी विमानतळावर खेळाडूंचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण कोरोनाच्या धास्तीने खेळाडूंनी चाहत्यांपासून लांब राहणे पसंत केले.

उद्या (बुधवार) दोन्ही संघ सराव करणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भारतीय संघ सराव करेल. तर त्यानंतर २ ते ५ या दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सराव सत्र होईल.

दरम्यान, चीनपासून सुरुवात केलेल्या कोरोना विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जगभरात जवळपास ४ हजाराहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावा लागले आहे, तर जगातील ९० हून अधिक देशात या विषाणू पसरला आहे. भारतामध्ये देखील कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - आयपीएलसह आरसीबीला कोरोनाचा फटका, काय आहे प्रकरण वाचा...

हेही वाचा - Ranji Final : सौराष्ट्रच्या दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद ३८४ धावा, अर्पित-पुजारा जोडीची शानदार खेळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.