ETV Bharat / sports

विराटने साधली शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी, आफ्रिदी म्हणतो... - Shahid Afridi news

आंतराराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबीने १२ वेळा सामनावीरचा पुरस्कार पटकावला आहे. त्याखालोखाल विराट कोहली आणि शाहिद आफ्रिदी यांनी प्रत्येकी ११ वेळा हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. नबीने ६८ सामन्यात, कोहलीने ७१ तर आफ्रिदीने ९९ सामन्यात हे पुरस्कार पटकावले आहेत.

विराटने साधली शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी, आफ्रिदीने केले कौतूक
author img

By

Published : Sep 19, 2019, 1:12 PM IST

मोहाली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ५२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ७२ धावा करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्याच्या या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी त्याला 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले.

विक्रमाचा धनी असलेला विराट सामनावीर पुरस्कार पटकावण्यातही अग्रेसर ठरला आहे. त्याने आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार पटकावून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीशी बरोबरी साधली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबी अव्वलस्थानी आहे.

हेही वाचा - IND VS SA : हवेत सूर मारुन कर्णधार कोहलीने घेतला 'विराट' झेल, पाहा व्हिडिओ

आंतराराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबीने १२ वेळा सामनावीरचा पुरस्कार पटकावला आहे. त्याखालोखाल विराट कोहली आणि शाहिद आफ्रिदी यांनी प्रत्येकी ११ वेळा हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. नबीने ६८ सामन्यात, कोहलीने ७१ तर आफ्रिदीने ९९ सामन्यात हे पुरस्कार पटकावले आहेत.

हेही वाचा - कर्णधार कोहलीने केले तीन 'विराट' विश्वविक्रम

दरम्यान, आफ्रिकेविरुध्दची विराट कोहलीची ७२ धावांची खेळी पाहून शाहिद आफ्रिदीनेही त्याचे कौतुक केले आहे. शाहिदने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'तू खरोखरच एक सर्वोत्तम खेळाडू आहेस, यापुढेही जगभरातल्या तुझ्या चाहत्यांसाठी असाच खेळत रहा' अशा शब्दांमध्ये आफ्रिदीने कोहलीची पाठ थोपटली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.